Monday, July 21, 2025
Home टेलिव्हिजन ‘लाफ्टर शेफ’ च्या सेटवर आनंदाची बातमी – प्रेग्नंसीचा शाॅक !

‘लाफ्टर शेफ’ च्या सेटवर आनंदाची बातमी – प्रेग्नंसीचा शाॅक !

अंकिता लाेखंडेने (Ankita Lokhande) ‘लाफ्टर शेफ’ (Laughter Chefs) च्या सेटवर खुशखबर दिली. ती कृष्णा अभिषेकशी बाेलताना म्हणाली, “हाे, मी प्रेग्नंट आहे”.

अंकिता लाेखंडे ही टीव्हीमधली प्रसिध्द अभिनेत्री आहे. ती तिच्या कामामुळे आणि वैयत्कि आयुष्यातल्या गाेष्टींमुळे नेहमी चर्चेत असते. तिनं विक्की जैनशी लग्न केलं आहे, आणि आता विक्कीही सतत चर्चेत असताे. सध्या दाेघं ‘लाफ्टर शेफ’ या शाेमध्ये एकत्र दिसत आहेत. या शाेचा एक नवीन प्राेमाे आला आहे, ज्यात अंकिता एक आनंदाची बातमी देताना दिसते.

कृष्णा अभिषेक एका इंग्रीडियंटसाठी अंकितासाेबत थाेडं मस्करीत पळत जातात. तेव्हा अंकिता ताे इंग्रीडियंट घेण्यासाठी त्यांच्या मागे धावताे. धावत धावत ती म्हणते, “मी प्रेग्नंट आहे, मी धावू शकत नाही”. हे एकून सगळेच आश्चर्यचकित हाेतात. कृष्णा अभिषेक विचारतात, “खरचं ?” तेव्हा अंकिता फक्त हसते. मग कृष्णा गाणं म्हणताे, “आज हमारे घर में आ रहा लल्ला है”. हे एकून करण कुंद्राही हैराण हाेताे.

आता अंकिताचं खरंच प्रेग्नंट असणं आहे की, फक्त मजा, हे तर एपिसाेड प्रसारित झाल्यावरच समजेल. कारण यापूर्वी तिनं ‘लॉकअप’ शाेमध्ये सुद्धा प्रेग्नंसीवरुन मजेशीर प्रॅंक केला हाेता. कलर्स टीवीने हा व्हिडिओ शेअर करत म्हटलं आहे, “अंकिताने ‘लाफ्टर शेफ’ मध्ये सगळ्यांना गाेंधळात टाकलं, जेव्हा तिनं दिली एक खास बातमी”.

अंकिताने बिजनेसमन विक्की जैनशी डिसेंबर 2021 मध्ये लग्न केलं. त्यांचं लग्न खूप गाजलं हाेतं. लग्नानंतर ती विक्कीसाेबत वेगवेगळ्या शाेज मध्ये दिसत आहे. दाेघांनी ‘स्मार्ट जोडी’ या शाेमध्ये भाग घेतला हाेता आणि ते जिंकलेही हाेते. नंतर ते ‘बिग बॉस’ मध्येही एकत्र आले हाेते. आता ते दाेघं ‘लाफ्टर शेफ 2’ मध्ये धमाल काॅमेडी करत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

दिलजीतच्या अडचणीत वाढ, FWICE ने ‘बॉर्डर २’ च्या निर्मात्यांना केले कास्टिंगचा विचार करण्याचे आवाहन

हे देखील वाचा