Tuesday, April 23, 2024

Ankita Lokhande: घटस्फोटाच्या चर्चेत अंकिता लोखंडेचा लग्नासंदर्भात धक्कादायक खुलासा

अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि तिचा पती विक्की जैन (Vicky jain)दोघे वैयक्तिक जीवनामुळे अधिक चर्चेत असतात. बिग बॉसच्या घरातील वाद आणि अंकिताच्या सासूनं व्यक्त केलेली नाराजी या सगळ्यांमुळं दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चेला उत आला होता. अशातच अंकिता लोखंडेने लग्नासंदर्भात धक्कादायक खुलासा केला आहे. त्यामुळं पुन्हा एकदा त्यांच्या वैवाहिक आयुष्यात कलह निर्माण झाल्याचे बोलले जात आहे.

नुकतंच अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि तिचा पती विक्की जैन ((Vicky jain)) कॉमेडियन भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया यांच्या पॉडकास्टमध्ये सहभागी झाले होते. यावेळी, दोघांनी वैयक्तित आयुष्याबद्दल अनेक धक्कादायक खुलासे केले. या शो दरम्यान अंकिताने त्यांच्या लग्नावर भाष्य केले. सुरुवातीला विक्कीने मला लग्नास नकार दिला होता. असा खुलासा अंकिताने यावेळी केला.

अंकिता म्हणाली, आमची लाईफस्टाईल पूर्णपणे वेगळी होती. त्यात विक्की हा बिलासपूर येथे राहायचा आणि मी मुंबईत. त्याला नेहमी वाटायचं की, त्याने बिलासपूरमधील मुलीसोबतच लग्न केलं पाहिजे. त्यामुळं विक्कीने मला लग्नास नकार दिला होता.

अंकिताच्या या वक्तव्यावर विक्कीने प्रतिक्रिया दिली आहे. ”अंकिताने मला बोलायची कधीच संधी दिली नाही. त्यामुळे मी काही बोलूच शकलो नाही. मला असं वाटायचं प्रत्येक गोष्टीची एक योग्य वेळ असते. जेव्हा आम्ही भेटलो तेव्हा अंकिता लग्न करण्याच्या स्थितीत नव्हती आणि मलाही तेव्हा असं काही वाटलं नाही.” असं विक्की म्हणाला.

 

View this post on Instagram

 

A post shared by ColorsTV (@colorstv)

बिग बॉस १७ दरम्यान, अंकिताची सासू रंजना जैन यांनी दिलेल्या मुलाखतीत, विकीने अंकितासोबत लग्न केलं आहे. आमचा दोघांच्या नात्याला कायम विरोधच होता. असं मोठं विधान केलं होत. बिग बॉस शोमध्ये अंकिता विकी यांचं वैयक्तिक आयुष्य, त्यांची भांडणं चव्हाट्यावर आली.

फॅमिली वीक नंतर दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चेला उधाण आलं होतं. घराबाहेर पडल्यानंतर सासू रंजना जैन यांनी अनेक मुलाखतींमध्ये अंकितावर गंभीर आरोप केले. तिच्याबद्दल अनेक वक्तव्य केली. मात्र त्यानंतर अनेक जण अंकिताच्या सपोर्टसाठी मैदानात उतरले होते.

अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांनी २०१९ मध्ये त्यांच्या नात्याची घोषणा केली होती. यानंतर, ५ वर्षे डेटिंग केल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि १४ डिसेंबर २०२१ रोजी लग्न केले.

हेही वाचा-

‘विकी नसता तर कदाचित मी काही करू शकले असते…’, अंकिता लोखंडेने पतीला खोटे पाडत केला खुलासा

हे देखील वाचा