Wednesday, July 3, 2024

नात्यांच्या निराळ्या गोष्टीची कहाणी सांगणाऱ्या ‘पवित्रा रिश्ता २.०’ चा टिझर अंकिताने केला शेअर

पवित्र रिश्ता या मालिकेतून प्रसिद्धी मिळवणारी लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय आहे. तिने नुकताच एक व्हिडिओ तिच्या इंस्टग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. हा व्हिडिओ तिच्या आगामी ‘पवित्र रिश्ता २.०’ या नवीन शोचा टीझर व्हिडिओ आहे. हा टीझर अतिशय खास आणि रोमँटिक दिसत आहे. हा ‘पवित्र रिश्ता’ शो डिजिटल स्पिन-ऑफ आहे. अंकिता पुन्हा एकदा अर्चनाची भूमिका साकारणार असून अभिनेता शाहीर शेख दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची मानव ही भूमिका निभावणार आहे.

 

पवित्रा रिश्ता २.० झी ५ या ऍपवर स्ट्रीम होणार असून, या शोच्या पहिल्याच टीझरमधून जुन्या पवित्र रिश्ताच्या आठवणींना उजाळा मिळत आहे. जुन्या मालिकेत देखील अर्चना आणि मानवाचा पावसाचा एक प्रोमो प्रदर्शित झाला होता. त्याच प्रमाणे पवित्र रिश्ता २.० चा हा ट्रेलर देखील प्रेक्षकांना मानव आणि अर्चनाची पावसात ओळख करून देत आहे. पाऊस नेहमीच प्रेमवीरांनासाठी एक रोमँटिक पर्याय असतो. याच पावसाच्या साक्षीने टीव्हीवर अनेक मोठ्या लव्हस्टोरी आपण घडताना पाहिल्या आहे. आता हाच पाऊस पुन्हा सर्वांच्या लाडक्या अर्चना आणि मानवला जवळ आणणार आहे. (ankita lokhande shared pavitra rishta 2.0 show teaser video)

या टीझरच्या मागे एक व्हॉइस ओव्हर ऐकू येत आहि, जो अतिशय आकर्षक आणि या टीझरला उत्तम पद्धतीने स्पष्ट करत आहे. काही नात्यांची गोष्टच निराळी असते. प्रेम खरे असेल तर ढगांशिवाय देखील पाऊस होती. काही नात्यांची गोष्टच निराळी असते. जे कधीही वाट बघण्यामध्ये वेळेचा हिशोब ठेवत नाही, त्या नात्यांमध्ये कधीच वेळ होत नाही. काही नात्यांची गोष्टच निराळी असते.

या टिझर व्हिडिओमध्ये अंकिता आणि मानवाची पहिली भेट, त्यांचे एकमेकांना आलेले स्थळ आणि शेवटी त्यांचे लग्न असे सर्वच या छोट्या टीझरमध्ये दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करताना अंकिताने लिहिले, “मानव आणि अर्चना असतील तेव्हा प्रेम हवेत असेल, त्यांच्या बरोबर प्रेमाच्या प्रवासात सामील व्हा.”

शाहीरने देखील हा टीझर व्हिडिओ त्याच्या अकाऊंटवरून शेअर करत लिहिले, “दोन सामान्य व्यक्तींची कहाणी जी एकमेकांना स्पेशल फील करत आहे.” एकता कपूर या शोची निर्मिती करत आहे. सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर अंकिता लोखंडेने एकता कपूरला पुन्हा एकदा ‘पवित्र रिश्ता’ करण्याचे आवाहन केले होते. जेणेकरून या शो मधून ते सुशांत सिंह राजपूतला श्रद्धांजली देऊ शकतील.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘मी स्वत:ला स्टारकिड मानत नाही’; अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारीचे मोठे वक्तव्य

-‘इंडियन आयडल १२’च्या ग्रँड फिनालेने टेलिव्हिजन विश्वात नोंदवला ‘हा’ खास विक्रम; टीमने आनंद साजरा केला

-‘बिग बीं’च्या सुरक्षेत तैनात हेड कॉन्स्टेबलची झाली बदली; पगाराची माहिती मिळताच बॉडीगार्डविरुद्ध विभागीय चौकशीचे आदेश

हे देखील वाचा