Saturday, June 29, 2024

‘स्वातंत्र्यवीर सावरकर’मधील अंकिता लोखंडेचा फर्स्ट लूक समोर; म्हणाली, ‘ही गोष्ट सांगण्यासाठी मी…’

वीर सावरकर (Veer Savarkar) यांच्या बायोपिक ‘स्वातंत्रवीर सावरकर’मध्ये बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा (Randeep Hooda) मुख्य भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाची घोषणा झाल्यापासून ‘स्वातंत्रवीर सावरकर’ या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. आता नुकतेच या चित्रपटासाठी आणखी एक नाव समोर आले आहे.

टेलिव्हिजन ते बॉलिवूड असा प्रवास करत घराघरामध्ये पोहचलेली अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita lokhande) लवकरच आगामी चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अंकिता लोखंडे यावेळी मुख्य भूमिकेमध्ये दिसणार आहे. अंकिता ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मुख्य अभिनेत्री असलेला हा अंकिताचा पहिलाच चित्रपट आहे. त्यामुळे या चित्रपटाबाबत ती जेवढी उत्सुक आहे. तेवढेच तिचे चाहते देखील उत्सुक आहेत. अंकिता लोखंडेने नुकताच या चित्रपटातील तिचा फर्स्ट लूक शेअर करत आपल्या नव्या चित्रपटाबाबतची गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

 

View this post on Instagram

 

अंकिताने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन स्वातंत्र्यवीर सावकर चित्रपटातील फर्स्ट लूक शेअर करताना लिहिले आहे की, “ही गोष्ट सांगण्यासाठी मी किती दिवसांपासून थांबले होते. ‘स्वांतत्र्यवीर सावरकर’ चित्रपटात मी मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारत आहे. प्रमुख भूमिका असलेला हा माझा पहिलाच चित्रपट आहे. हा प्रवास अनुभवण्यासाठी मी उत्सुक आहे.”

अंकिताने या पोस्टमध्ये चित्रपटाची टीम आणि निर्मात्यांचेही आभार मानले आहेत. तिने पुढे असे लिहिले आहे की, ‘हे तुमच्याशिवाय शक्य झाले नसते. तुम्ही कायमच माझ्या पाठीशी उभे राहिला आहात. थँक यू प्रोड्युसर साहेब. मला ही संधी दिल्याबद्दल ‘आनंद पंडित मोशन पिक्चर’चे आभार. एक उत्तम अभिनेता आणि आता दिग्दर्शकाचीही भूमिका पार पाडणाऱ्या रणदीप हुड्डालाही धन्यवाद.’ अंकिताची ही पोस्ट व्हायरल होत असून तिच्या फर्स्ट लूकला चाहत्यांनी खूपच चांगली पसंती दिली आहे. या पोस्टवर कमेंट्स करत चाहत्यांनी तिला खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या आहेत.

‘स्वांतत्र्यवीर सावरकर’ हा चित्रपट क्रांतिकारक विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटात अंकिता लोखंडेसोबतच बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा मुख्य भूमिकेत आहे. रणदीप हुड्डासोबत अंकिता या चित्रपटात स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. रणदीप हुड्डाने या चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शन क्षेत्रात एन्ट्री केली आहे. अंकिता लोखंडेच्या या चित्रपटाबाबत तिच्या चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. ते तिच्या या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
कियारा अडवाणीसोबतच्या लग्नावर सिद्धार्थ मल्होत्राने तोडले मौन, म्हणाला, ‘काहीही गुप्त ठेवणार…’
बॉयफ्रेंडसाठी राखीनं ठेवला करवा चौथ, त्याच्यासाेबत विमानतळावर झाली स्पॉट, व्हिडिओनं वेधलं लक्ष

हे देखील वाचा