Sunday, July 14, 2024

प्रेग्नंसीबाबत अंकिता लोखंडे म्हणाली; ‘मी अजून बाळ आहे’, उषा नाडकर्णीने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया

अंकिता लोखंडे (ankita lokhande) ही एक प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये अंकिताने विकी जैनसोबत लग्न केले. लग्नानंतर विकी आणि अंकिता सुखी आयुष्य जगत आहेत. दरम्यान, अंकिता आई होणार असल्याची बातमीही वेगाने पसरत आहे. मात्र, अंकिताने यावर सांगितले होते की, तिचा आणि विकीचा सध्या पालक बनण्याचा कोणताही विचार नाही. पण एका टीव्ही शोमध्ये पोहोचलेल्या अंकिताने आई होण्याच्या प्रश्नावर अशी प्रतिक्रिया दिली की तिची सासू सविता ताईही ‘पवित्र रिश्ता’मध्ये प्रतिक्रिया देण्यापासून स्वतःला रोखू शकल्या नाहीत.

अंकिता लोखंडेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. टेलिव्हिजन रिअॅलिटी शो डीआयडी सुपर मॉमच्या विशेष आगामी भागाचा प्रोमो समोर आला आहे. या एपिसोडमध्ये अंकिता आणि टीव्हीची प्रसिद्ध अभिनेत्री उषा नाडकर्णी यांची जोडी एकत्र दिसणार आहे. ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेत उषाने अंकिताच्या सासूची आणि सुशांत राजपूतच्या आईची भूमिका साकारली होती.

या प्रोमोमध्ये अंकिता लोखंडे शोच्या जज उर्मिला मंटोडकरसोबत ‘रंगीला’ चित्रपटाच्या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. अंकिता आणि उर्मिलाचा डान्स पाहून शोमध्ये उपस्थित भाग्यश्री आणि उषा नाडकर्णी टाळ्या वाजवताना दिसत आहेत. यानंतर शोचा होस्ट जय भानुशाली अंकिताला विचारतो, ‘सांग भी दो तू सुपर मॉम कधी बनते आहेस? याला उत्तर देताना अंकिता लहान मुलासारखा आवाज काढत म्हणते की, आता मी बाळ आहे, मी स्वतः बाळ आहे. यावर सविता ताई म्हणजेच उषा हिने तिच्या ओळखीच्या शैलीत अंकिताकडे बोट दाखवत ‘आजा’ म्हणाली. यावर अंकिता आणि जज रेमो डिसूझा यांच्यासह शोमध्ये उपस्थित असलेले सर्वजण हसू लागले.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘तू आई कधी होणार?’, चाहतीच्या प्रश्नावर संतापली हेमांगी कवी; म्हणाली, ‘हे असले प्रश्न…’
‘कार्तिकेय 2’ ची बॉक्स ऑफिसवर बंपर कमाई, एकूण इतक्या कोटींचा जमवला गल्ला
अखेर चाहत्यासमोर झुकला जुनिअर एन टीआर, भरसभेत ‘या’ कारणामुळे मागितली माफी,

हे देखील वाचा