Monday, June 9, 2025
Home बॉलीवूड ‘पवित्र रिश्ता २.०’चा ट्रेलर चाहत्यांच्या भेटीला; चाहते म्हणाले, ‘सुशांतशिवाय सर्वकाही अपूर्ण’

‘पवित्र रिश्ता २.०’चा ट्रेलर चाहत्यांच्या भेटीला; चाहते म्हणाले, ‘सुशांतशिवाय सर्वकाही अपूर्ण’

लोकप्रिय टेलिव्हिजन अभिनेत्री अंकिता लोखंडेने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे ‘पवित्र रिश्ता २.० ‘चा ट्रेलर चाहत्यांसोबत शेअर केला आहे. हा ट्रेलर अतिशय मनोरंजक आणि आकर्षक आहे. हे ‘पवित्र रिश्ता’चे डिजिटल व्हर्जन आहे. ट्रेलरमध्ये प्रेम आणि संघर्ष दोन्ही दाखवले आहेत. अंकिता लोखंडे तिच्या जुन्या लूकमध्ये दिसत आहे, तर शाहीर शेखलाही पहिल्या पर्वामध्ये सुशांत सिंग राजपूत सारखाच लूक देण्यात आला आहे.

अंकिता अर्चनाची भूमिका साकारत आहे, तर शाहीर शेखने दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतची जागा घेतली आहे. आता तो मानवचे पात्र साकारणार आहे. ट्रेलरची सुरूवात अंकिता लोखंडेचे पात्र अर्चनाने होते. ती एका रेल्वे स्टेशनच्या फूटओव्हर ब्रिजवर चालताना दिसते. तिच्या चेहऱ्यावर एक सुंदर स्मित हास्य दिसते. यानंतर मुंबईत धावत्या लोकल रेल्वे दाखवण्यात आल्या. अर्चनाची आई तिच्या मॅडमशी चांगले संबंध जोडायला सांगते.

यानंतर शाहीर शेखचा प्रवेश होतो. मग दोघांच्या भेटीची झलक दिसते. नंतर, दोघांच्या कुटुंबातील सदस्य या नात्याबद्दल बोलतात. यासाठी मानवची आई खोटं बोलते. मात्र, अर्चना-मानव लग्न करतात, पण मानवचे सत्य फक्त लग्नाच्या मंडपातच कळते. यानंतर त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण होतो आणि मग मानव अर्चनाला भेटण्याचा प्रयत्न करतो आणि माफी मागतो. ट्रेलर खूप सुंदर आहे. १५ सप्टेंबरपासून झी५ वर त्याचा प्रीमियर होईल.

दिवंगत सुशांत सिंग राजपूतचे चाहते ट्रेलरमधील शाहीर शेखला पसंत करत नाहीत. त्याच्या चाहत्यांचे म्हणणे आहे की, “सुशांत सिंग राजपूतची जागा इतर कोणीही घेऊ शकत नाही.” बऱ्याच चाहत्यांनी लिहिले की, ते सुलोचना ताई आणि सुशांत सिंग राजपूतला मिस करत आहेत. एका चाहत्याने लिहिले, “शोमध्ये सर्व काही ठीक आहे, पण सुशांत सिंग राजपूतशिवाय हा शो अपूर्ण आहे.”

अनेक चाहत्यांनी अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-सई ताम्हणकरचा समुद्रात जलवा; चाहते तर सोडाच, कलाकारांनीही पाडला कमेंट्सचा पाऊस

-‘नुसती क्यूट आहेस तू’, म्हणत वीणा जगतापच्या फोटोवर चाहत्याने केली लक्षवेधी कमेंट

-‘आये… तुझं हसणं हीच माझ्या आयुष्यातील खरी कमाई’, म्हणत सिद्धूकडून आईला वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा!

हे देखील वाचा