पवित्र रिशता फेम अभिनेत्री अंकिता लोखंडे सध्या झी रीश्ते अवॉर्डस ची तयारी करत आहे. रोज ती तिच्या सोशल मीडिया अकाउंट वरून तालमीचे व्हिडीओ पोस्ट करून याबद्दल माहिती देत असते. अंकिता एका विशेष सादरीकरणातून सुशांतला ट्रिब्युट देणार आहे. याच रिहर्सल मध्ये सुशांतची ऑन स्क्रीन आई उषा नाडकर्णी यांच्याशी भेट झाली. असाच एक व्हिडिओ तिने पोस्ट केला की आई म्हटलं आहे की खूप दिवसांनी आईची आणि माझी भेट झाली. अंकिता आणि उषा नाडकर्णी यांची ही भेट खूपच भावुक झाली. हा व्हिडीओ तिने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
पवित्र रिशता ही मालिका संपल्यानंतर अंकिता आणि आऊ या फार क्वचितच भेटल्या होत्या. इतक्या वर्षांनी ह्या दोघी एकमेकींना भेटल्या आहेत. अंकिता म्हणते,”खूप वर्षांनी आज आईला भेटले. ती दिवसेंदिवस तरुणच होत चालली आहे… एकदम कडक आई”
आपली ऑन स्क्रीन सासू आऊ ला भेटल्यानंतर अंकिता आणि आऊंच्या खूप गप्पा झाल्या. बरेच तास त्या बोलत राहिल्या. सुशांत बद्दलच्या आठवणींना उजाळा देत असताना एकीकडे आऊ भावुक झाल्या तर दुसरीकडे अंकिताच देखील मन हलकं झालं. पवित्र रिशता मालिकेच्या जुन्या आठवणींना उजाळा देताच आऊंच्या डोळ्यात अश्रू तरळले.
आऊंनी पवित्र रिशता या मालिकेत सुशांतच्या आईची भूमिका साकारली होती. अंकीताची सासू म्हणून आऊंनी त्यांचा कडकपणा हा मालिकेत दाखवला होता. सुशांत आणि आऊंचे बरेचसे सिन एकत्रच असायचे त्यामुळे ते दोघेही बराच काळ एकत्र वेळ घालवायचे. सुशांत हा आऊंना खूप मानत असे.