Tuesday, June 24, 2025
Home कॅलेंडर अंकिता लोखंडेकडून सुशांतला अनोखी श्रद्धांजली, व्हिडिओ पाहून सगळेच झाले भावूक; चाहतेही म्हणाले…

अंकिता लोखंडेकडून सुशांतला अनोखी श्रद्धांजली, व्हिडिओ पाहून सगळेच झाले भावूक; चाहतेही म्हणाले…

अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि सुशांतसिंह यांच्यात एक वेगळाच बाँड होता. दोघे अनेक वर्ष रिलेशनशीपमध्ये होते. सुशांतच्या मृत्यूनंतर अंकिता पूर्णपणे हादरून गेल्याचे सर्वांनीच पाहिले होते. तिने सोशल मीडियावर त्याच्यासाठी काही पोस्टही केल्या होत्या.

अभिनेता सुशांतसिंह राजपूतला जाऊन आता जवळपास सहा महिने झाले आहेत. मात्र, अद्यापही त्याचे चाहते, मित्रपरिवार, कुटुंबीय यांना हे सत्य पचवणे कठीण जात आहे. वेगवेगळ्या माध्यमातून ते सुशांतची आठवण काढत असतात.

आता अंकिताने देखील सुशांतच्या आठवणीत एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. तीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यात तीने सुशांतसिंहने अभिनय केलेल्या ‘धोनी-द अनटोल्ड स्टोरी’ चित्रपटातील ‘कौन तुझे’ या गाण्यावर डान्स करत आहे.

27 डिसेंबर रोजी सुशांत आणि अंकिताच्या चाहत्यांना अंकिताचा हा डान्स परफॉरमन्स पाहता येणार आहे. अंकिताचा हा सुंदर परफॉर्मन्स तिच्या चाहत्यांना खूप आवडत आहे.

तिच्या या श्रद्धांजलीमुळे अनेकांना त्यांच्या बेस्ट जोडीचीही आठवण झाली. अंकिता आणि सुशांतने डान्स शो केला होता. अंकिता लोखंडेचा हा व्हिडीओ व्हायरल अशा अनेक कमेंट्स सोशल मीडियावर येत आहे.

हे देखील वाचा