अभिनेत्री अंकिता लोखंडे सध्या तिचे वैवाहिक आयुष्य एन्जॉय करताना दिसत आहे. ती नेहमीच तिचा पती विकी जैनसोबत सोशल मीडियावर फोटो शेअर करत कहते. या दिवसात हे जोडपे ‘स्मार्ट जोडी’ या शोमध्ये दिसत आहे. अशातच अंकिताने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती तिच्या पतीसोबत डान्स करताना दिसत आहे. अंकिताने या व्हिडिओमध्ये ‘दम मारो दम’ या गाण्यावर डान्स केला आहे. या गाण्यावर दोघेही डान्स करत आहेत. ज्यात त्यांची केमेस्ट्री अगदी अफलातून दिसत आहे.
अंकिताने (ankita lokhande) शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये मागे एक व्यक्ती बसलेली दिसत आहे. ती व्यक्ती मोबाईलमध्ये इतकी व्यस्त आहे की, त्यांना मागील देखील नाही त्यांच्या समोर डान्स चालला आहे. व्हिडिओ पाहून असे वाटत आहे की, घरातीलच कोणतातरी व्यक्ती असावी. सोशल मीडिया युजर्स देखील हे जाणून घेण्यासाठी उत्सुक आहे की, मागे नक्की कोण बसले आहे. अनेकांनी या व्हिडिओवर कमेंट देखील केल्या आहेत.
अंकिताचा या व्हिडिओवर एकाने कमेंट केली आहे की, “पापाजी मागे बसले आहेत. त्यांना यात काहीही रस नाहीये.” तसेच काहीजण मागे बसलेली व्यक्ती तिचे सासरे आहेत असे म्हणत आहेत. एका युजरने लिहिले की, “मागे सासरे बसलेले आहेत आणि सून बघा काय करते.”
अशाप्रकारे वेगवेगळ्या कमेंट करून अंकितला ट्रोल करत आहेत. तिच्या डान्सपेक्षा तिच्या मागे बसलेल्या त्या व्यक्तीने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यामुळे सगळेजण जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत की, ती व्यक्ती नक्की कोण आहे जी डान्स चालू असताना देखील मोबाईलमध्ये इतकी व्यस्त आहे.
अंकिता लोखंडे आणि विकी जैनने १४ डिसेंबर २०२१ रोजी लग्न केले. त्यांच्या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यांनी त्यांचे लग्न अगदी थाटामाटात केले. अनेक कलाकार त्यांच्या लग्नाला उपस्थित होते.
हेही वाचा :