Tuesday, July 9, 2024

अंकुश राजाच्या ‘हम तो लडकी पटाते कमर देख के’ गाण्याचा युट्यूबवर राडा; मिळाले ‘इतके’ लाख हिट्स

सध्या मनोरंजन क्षेत्रात रोज नवनव्या गाण्यांची चर्चा सुरू आहे. प्रेक्षकांच्या भेटीला अनेक गाणी येत आहेत, ज्यामुळे सोशल मीडियावर रिल्सचा महापूर येत आहे. सध्या सर्वत्र ‘कच्चा बदाम’ गाण्याची चर्चा पाहायला मिळत आहे. मात्र, आता एका नव्या भोजपूरी गाण्याने सोशल मीडियावर धुमाकुळ घातला आहे. अल्पावधीतच हे गाणे जोरदार व्हायरल होताना दिसत आहे.

प्रसिद्ध भोजपूरी गायक आणि अभिनेता अंकुश राजाचे (Ankush Raja) प्रत्येक गाणे हिट ठरत असते. अंकुश राजा आणि शिल्पी राजच्या आवाजाच्या जादूने त्यांची गाणी जोरदार लोकप्रिय होताना दिसत आहेत. आता या जोडीचे आणखी एक नवे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे, जे सध्या जोरदार व्हायरल होत आहे.

“लडकी पटाते कमर देख के” असे या गाण्याचे बोल असून या गाण्याने सध्या युट्यूबचे तापमान चांगलेच वाढवले आहे. या गाण्याला अंकुश राजाने आपन भोजपूरी या युट्यूब चॅनेलवर प्रदर्शित केले होते. या गाण्यामध्ये अंकुश राजा आणि अभिनेत्री मधु प्रसाद यांचा धमाकेदार डान्स पाहायला मिळत आहे. या गाण्यातील अंकुशच्या कपड्यांनी सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. पारंपारिक पेहरावातील त्याच्या लूकची सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर गाण्यातील अभिनेत्री मधु प्रसादने कधी लेहंग्यामध्ये, तर कधी पारंपारिक ड्रेस घालत धमाल केली आहे. तिच्या ठुमक्यांनीही सर्वांना घायाळ केले आहे. हे गाणे सध्या वेगाने व्हायरल होत असून एकाच दिवसात तब्बल ७ लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे, तर ५ हजारांपेक्षा जास्त लाईक्स मिळाल्या आहेत.

या गाण्याच्या यशाबद्दल बोलताना अंकुश राजा यांनी सांगितले की, “फक्त मनोरंजनाच्या उद्देशाने आम्ही हे गाणे तयार केले होते. मात्र, अत्यंत कमी वेळात या गाण्याला भरभरून प्रतिसाद मिळाला त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो.”

जोरदार व्हायरल होत असलेले ‘लडकी पटाते कमर देख के’ गाणे मनोज मतलबी यांनी लिहीले आहे, तर या गाण्याचे दिग्दर्शन आर्यन देव यांनी केले आहे.

हेही वाचा-

हे देखील वाचा