नादच खुळा! अंकुश राजाचे नवीन गाणे रिलीझ होताच झाले व्हायरल; नीलम गिरीच्या लूकने वेधले सर्वांचे लक्ष


संगीत क्षेत्रात भारताने चांगलीच प्रगती केली आहे. हिंदी आणि मराठी संगीतसृष्टीप्रमाणेच आता भोजपुरी संगीतसृष्टीही यशाची शिखरे गाठताना दिसत आहे. जेवढी हिंदी आणि मराठीतील गाणी प्रदर्शित होत नसतील, कदाचित त्यापेक्षाही अधिक गाणी भोजपुरी संगीतसृष्टीत प्रदर्शित होतात. नुकतेच भोजपुरी स्टार अंकुश राजाचे नवीन गाणे प्रदर्शित झाले आहे. प्रदर्शित होताच हे गाणे व्हायरल झाले आहे.

अंकुश राजाच्या नवीन गाण्याचे नाव ‘कमर लवकउआ’ आहे. या गाण्यात त्याच्यासोबत ‘ट्रेंडिंग गर्ल’ नीलम गिरी आहे. हे गाणे समर सिंग आणि ‘ट्रेंडिंग सिंगर’ शिल्पी राज यांनी गायले आहे. ‘कमर लवकउआ’ हे गाणे मंगळवारी (६ जुलै) वर्ल्डवाईड भोजपुरीच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर प्रदर्शित झाले आहे. (Bhojpuri Star Ankush Raja And Shilpi Raj Neelam Giri Song Kamar Lapkauaa Released On Youtube)

या गाण्यात अंकुश राजा आणि नीलम गिरीच्या परफॉर्मन्सने सर्वांना आपला दीवाना बनवले आहे. या धमाकेदार गाण्यात नीलम खूपच सुंदर दिसत आहे. तिने आपल्या लूकने सर्वांचे लक्ष वेधले आहे. कदाचित यापूर्वी ती एवढी सुंदर कधीच दिसली नसेल. या गाण्यात नीलमच्या अदा आणि तिचा कातिलाना अंदाज चाहत्यांना घायाळ करत आहे. सोबतच अंकुश राजाही खूप रोमँटिक अंदाजात डान्स करत आहे. त्यांचा हा डान्स पाहण्यासारखा आहे.

हे गाणे भव्यरीत्या चित्रीत केले आहे. यामध्ये डान्स, लोकेशन, कॉस्च्युम, डान्सर्स आणि स्टाईल यांचे मिश्रण आहे. हे गाणे पाहिल्यानंतर तुम्हीही थिरकू लागाल.

भोजपुरीतील स्थानिक आणि गुणवत्तापूर्ण गाण्यांना प्रोत्साहित करण्यासाठी प्रसिद्ध संगीत कंपनी वर्ल्डवाईड रेकॉर्ड्स भोजपुरीला ओळखले जाते. या कंपनीने या गाण्याचा टिझर रिलीझ केला होता. तेव्हापासूनच प्रेक्षकांना या गाण्याची उत्सुकता लागली होती. या गाण्याला काही तासातच ८ लाखांपेक्षाही अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

याव्यतिरिक्त लाईक्स आणि कमेंट्सचाही पाऊस पडत आहे. रत्नाकर कुमार हे वर्ल्डवाईड रेकॉर्ड्स प्रस्तुत या गाण्याचे निर्माते आहेत. या गाणेचे संगीतकार छोटू रावत, गीतकार बोस रामपुरी, दिग्दर्शक रवी पंडित, नृत्यदिग्दर्शक ऋतिक आरा, एडिटर दीपक पंडित, गार्जियन लखन बाबा आणि प्रॉडक्शन हेड पंकज सोनी आहेत.


Leave A Reply

Your email address will not be published.