बॉलिवूड अभिनेत्री नेहा धुपियाने मिस इंडियाचा किताब पटकावला आहे. त्यानंतर तिने चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. नेहा धुपिया बॉलिवूडमध्ये तिच्या ‘रफ ऍंड टफ’ इमेजसाठी ओळखली जाते. यासोबतच ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे अनेकदो चर्चेत येते. शिवाय तिच्या अफेअरच्या बातम्याही समोर येत यायच्या. 10 मे 2018 रोजी नेहा धूपियाने अभिनेता अंगद बेदीशी लग्न केले. विशेष म्हणजे, दोघांच्या लग्नामागील कारण खूप रंजक आहे.
View this post on Instagram
खरं तर, नेहा लग्नापूर्वीच प्रेग्नेंट राहिली होती. ती अनेक वर्षांपासून अंगद बेदीला डेट करत होती. अंगद केवळ तिचा बॉयफ्रेंड नाही, तर बालपणीचा मित्र देखील आहे. नेहाने लग्नाच्या तिसऱ्या महिन्यांनंतरच तिच्या प्रेग्नेंसीची बातमी सोशल मीडियावर शेअर केली होती. ही बातमी ऐकल्यानंतर नेटकरी तिला वेगवेगळ्या पद्धतीने ट्रोल करत होते. तसेच नेहाचे लग्न आणि गरोदरपणावर तिच्या पालकांच्याही वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत होत्या.
एका मुलाखतीत नेहाचा पती अंगद बेदीने सांगितले होते की, “लग्नापूर्वी नेहाच्या आई-वडिलांना नेहा आई होणार असल्याचे कळवल्यावर त्यांच्या घराचे वातावरण पूर्ण बदलले होते.” पुढे तो म्हणाला की, “नेहाला तिच्या आई -वडिलांना तिच्या गर्भधारणेविषयी अजिबात कळून द्यायचे नव्हते.” दरम्यान, नेहाने अंगदला तिच्या आईवडिलांशी लग्नाबद्दल बोलण्यास सांगितले होते. पण अंगदला वाटत होते की, नेहाच्या आई -वडिलांना हे सर्व कळले पाहिजे की, त्यांची मुलगी तीन महिन्यांची प्रेग्नेंट आहे.
View this post on Instagram
अंगद बेदी नेहाच्या आई -वडिलांकडे गेले तेव्हा त्यांने सांगितले की,‘नेहा प्रेग्नेंट आहे.’ हे ऐकल्यानंतर नेहाच्या आई- वडिलांना धक्काच बसला आणि ते अस्वस्थ झाले. हे ऐकून नेहाच्या आईची तब्येत खालावली होती. तेव्हा तिच्या आईच्या नाकातून रक्तही बाहेर येऊ लागले होते. पण कशीतरी वेळ सांभाळून घेतली. अंगदने नेहाच्या आई -वडिलांना समजावून सांगितले आणि नंतर त्यांनी लग्न केले. नेहा आणि अंगद यांचे लग्न दिल्लीतील एकाच गुरुद्वारामध्ये झाले होते. दोघांनी बऱ्याच गुपचुप पद्धतीने लग्न केले होते.
लग्नानंतर काही दिवसांतच नेहाने तिच्या मुलीला जन्म दिला. मुलीचे नाव मेहेर ठेवले आहे. नेहा आता पुन्हा एकदा प्रेग्नेंट आहे आणि लवकरच तिच्या घरी एक छोटा पाहुणा येणार आहे. नेहाच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर नेहा ‘नो फिल्टर’ नावाच्या चॅट शोमध्ये दिसते. जिथे ती सेलिब्रेटिंसोबत खूप गप्पा मारते.
हेही वाचा-
–खरंच की काय! नेहा धुपियाला किस करण्यापुर्वी ‘या’ अभिनेत्याला धुवावे लागले होते पाचवेळा हात
–असे काय झाले होते की अंगद बेदी आणि नेहा धुपीयाला करावे लागले होते पळून जाऊन लग्न?