×

खरंच की काय! नेहा धुपियाला किस करण्यापुर्वी ‘या’ अभिनेत्याला धुवावे लागले होते पाचवेळा हात

प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्माच्या (Kapil Sharma) कार्यक्रमात अनेक कलाकार आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी येत असतात. यावेळी हे कलाकार असे काही खुलासे करतात, जे ऐकून प्रत्येकालाच आश्चर्य वाटते. असाच एक खुलासा अभिनेत्री नेहा धुपियाने (Neha Dhupia) कपिल शर्माच्या कार्यक्रमात केला आहे. 

नेहा धूपिया ही हिंदी चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. नुकतीच ती अभिनेत्री यामी गौतमसोबत (Yami Gautam) ‘ए थर्सडे’च्या प्रमोशनसाठी कपिल शर्माच्या कार्यक्रमात आली होती. यावेळी तिने घातलेल्या लाल साडीने सगळ्यांचे लक्ष वेधले होते. यावेळी कपिल शर्मासोबत बोलताना तिने सांगितले की, ‘दस कहानियां’ चित्रपटाच्यावेळी एक किस करण्याआधी अभिनेते महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांना पाच वेळा हात धुवायला लावला होता. (neha dhupia got mahesh manjrekar to wash his hands 5 times before kiss)

नेहाच्या या खुलाशाने सगळेच चकित झाले होते. पुढे बोलताना नेहा म्हणाली की, “आता माझे लग्न झाले असून, अशा भूमिका करायचे बंद केले आहे.” नेहाच्या अजब दाव्यावर तिची फिरकी घेताना कपिल शर्मा म्हणतो की, मग पानीपुरी वाल्यालाही अंघोळ करायला किंवा हात धुवायला लावतेस का? यावर सरळेच पोट धरून हसायला लागले.

नेहा धुपियाच्या ‘ए थर्सडे’ चित्रपटाची कथा अपहरणावर आधारित आहे. यामध्ये यामी गौतम एका मुलाचे अपहरण करते आणि ६ कोटीची खंडणी मागते अशी कथा दाखवली आहे. नेहा धुपियाने लग्न केल्यापासून चित्रपटक्षेत्रात काम करणे कमी केले आहे.

हेही वाचा –

हेही पाहा-

Latest Post