Sunday, December 8, 2024
Home अन्य चिरंजिवी ते वैजयंती माला, कला क्षेत्रातील ‘या’ मान्यवरांनी उमटवली पद्म पुरस्कारावर मोहोर

चिरंजिवी ते वैजयंती माला, कला क्षेत्रातील ‘या’ मान्यवरांनी उमटवली पद्म पुरस्कारावर मोहोर

देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक मानला जाणारा पद्म पुरस्कार, पद्मविभूषण(Padma Vibhushan), पद्मभूषण(Padma Bhushan) आणि पद्मश्री(Padma Shri) या तीन श्रेणींमध्ये हा पुरस्कार दिला जातो. कला, सामाजिक कार्य, सार्वजनिक गोष्टी, विज्ञान आणि इंजिनियरिंग, व्यापार आणि उद्योग, उपचार, साहित्य आणि शिक्षण, क्रीडा, नागरी सेवा इत्यादी क्षेत्रात हे पुरस्कार दिले जातात. यावर्षीचे म्हणजेच 2024 चे पद्म पुरस्कार नुकतेच जाहीर झाले आहेत.काल गणतंत्र दिवसाच्या पुर्वसंध्येला हे पुरस्कार जाहीर करण्यात आले. यावर्षीच्या पद्म ऍवाॅर्डस मध्ये साऊथचा मेगा स्टार चिरंजीवी यांचाही समावेश असल्याचेही समोर आले आहे. त्यांना पद्मविभूषणने या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. प्रसिद्ध अभिनेत्री वैजयंतीमाला आणि भारतीय शास्त्रीय भरतनाट्यम नृत्यांगना पद्मा सुब्रमण्यम यांनाही पद्मविभूषण पुरस्कार देणार असल्याचे जाहीर झाले आहे.

चिरंजीवींनी(Chiranjeevi) 1978मध्ये अभिनयक्षेत्रात पाऊल ठेवले आणि बघता बघता भारतीयच नव्हे तर परदेशातंही आपला चाहतावर्ग निर्माण केला. चार दशकांच्या कारकिर्दीत चिरंजीवीने तेलुगु, तमिळ, कन्नाडा आणि हिंदी अशा वेगवेगळ्या भाषेतील चित्रपट केले. त्यांच्या 40 वर्षांच्या ऍक्टींग करियरमध्ये त्यांनी 160 चित्रपट केले आहेत. चित्रपटांव्यतिरिक्त ते समाजसेवाही करतात आणि भरपूर दानधर्मही करतात. आता या अभिनेत्याला कला क्षेत्रातील पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.यापुर्वीही 2006मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. चिरंजीवींनी नेहमीच आपल्या चित्रपटातून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. यासोबतच त्यांच्या चित्रपटांमध्ये काही ना काही सामाजिक उद्देशही लपलेला असतो.

भारतीय शास्त्रीय भरतनाट्यम नृत्यांगना पद्मा सुब्रमण्यम(padma subrahmanyam) यांनाही पद्म विभूषण देऊन गौरविण्यात येणार आहे. त्या रिसर्च स्कॉलर, कोरिओग्राफर, संगीतकार, गायिका, शिक्षिका, इंडोलॉजिस्ट आणि लेखिका देखील आहेत. त्या भारताबरोबरच परदेशातही प्रसिद्ध आहेत. जपान, ऑस्ट्रेलिया आणि रशियासारख्या देशांनी त्यांच्या सन्मानार्थ अनेक चित्रपट आणि माहितीपट बनवले आहेत. त्या नृत्य प्रकाराच्या संस्थापिका आणि भरत नृत्याच्या संस्थापिका म्हणून ओळखल्या जातात.

या वर्षी चिरंजीवीसोबतच हिंदी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री वैजयंती माला बाली(vaijayanti mala) यांनाही पद्मविभूषण देण्याची घोषणा करण्यात आली आहे. वैजयंती माला यांच्या कला क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल त्यांना हा सन्मान देण्यात येणार आहे. यावर्षी चिरंजीवी, पद्मा सुब्रमण्यम आणि वैजयंती माला बाली यांच्या व्यतिरिक्त यादीत हिंदी चित्रपटसृष्टीतील मिथुन चक्रवर्ती(Mithun Chakraborty ), गायिका उशा उथुप आणि संगीतकार प्यारेलाल शर्मा यांचाही समावेश आहे.

author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा