Monday, April 14, 2025
Home टेलिव्हिजन Anupamaa | निर्मात्यांवर नाराज झाले गौरव खन्नाचे चाहते, ट्रेड होतंय #AnujIsHope

Anupamaa | निर्मात्यांवर नाराज झाले गौरव खन्नाचे चाहते, ट्रेड होतंय #AnujIsHope

स्टार प्लसवर प्रसारित होणारी ‘अनुपमा’ ही मालिका पहिल्या दिवसापासूनच प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. या शोमधील सर्वच व्यक्तिरेखा खूप प्रसिद्ध आहेत. अनुपमापासून (रुपाली गांगुली) ते वनराजपर्यंत (सुधांशू पांडे) सर्वजण खूप लोकप्रिय आहेत. मात्र, जेव्हा अनुज कपाडिया म्हणजेच गौरव खन्ना (Gaurav Khanna) शोमध्ये आला, तेव्हा शोच्या टीआरपीने मोठी उडी घेतली. शोमधील गौरव आणि रुपाली गांगुलीची केमिस्ट्री चाहत्यांना त्यांच्याकडे आकर्षित करण्यात अधिक यशस्वी ठरली. मात्र, शोच्या लेटेस्ट प्रोमोमुळे चाहते ‘अनुपमा’च्या निर्मात्यांवर चांगलेच संतापले आहेत आणि #Anujishope ट्विटरवर व्हायरल होत आहे.

खरं तर, प्रोमोमध्ये अनुजची भिंतीवरची फोटो फ्रेम खाली पडल्याचे दाखवण्यात आले आहे. या दिवसांमध्ये अनुज आणि अनुपमा यांची छोटी मुलगी अनुने या शोमध्ये प्रवेश केला असून, या शोमध्ये एक नवा ट्विस्ट आला आहे. अनुपमाचे कुटुंब लहान अनुच्या येण्याने खूप नाराज आहे, तर अनुजचा भाऊ आणि वहिनी मालमत्तेसाठी युक्ती खेळत आहेत. लेटेस्ट प्रोमोमध्ये, अनुपमा पती अनुजचे स्वप्न पूर्ण करण्याबद्दल बोलत आहे. ती अस्वस्थ असते आणि तिच्या आईला विचारते की, ती अनुजची स्वप्ने कशी पूर्ण करेल. (anuj fans angry on anupamaa makers)

दरम्यान, तिची आई अनुपमाला आशा देते, त्यामुळे अनुपमाचा आत्मविश्वास परत येतो. मात्र भिंतीवरची अनुजची फोटो फ्रेम खाली पडून तुटते. हे पाहून चाहत्यांना असे वाटते की, कदाचित अनुपमाचे निर्माते अनुजचा ट्रॅक पूर्ण करण्याचा विचार करत आहेत. कदाचित तो शोमध्ये मारला जाईल. यावर अनुजचे चाहते सोशल मीडियावर नाराजी व्यक्त करत आहेत.

एका यूजरने लिहिले की, “आता या शोसाठी आमची एकमेव आशा आहे. कृपया आमची आशा मरू देऊ नका @StarPlus @ketswalawalkar #Anupamaa • #MaAn • #AnujKapadia #Anujishope.” तर एकाने लिहिले, “या महिन्यात त्याचा वाढदिवस येत आहे! आता त्याला का मारताय? #Anujishope.” अशाप्रकारे चाहते शोच्या लेटेस्ट प्रोमोवर त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. आगामी एपिसोड्समध्ये कथेत काय ट्विस्ट येणार हे पाहणं रंजक ठरेल.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा