Thursday, March 28, 2024

‘कोण करण जोहर?’ नयनतारा बद्दलच्या ‘त्या’ वक्तव्यानंतर चाहत्यांनी करण जोहरची उडवली खिल्ली

नयनतारा (Nayanthara) ही दाक्षिणात्य सिने जगतातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आपल्या दमदार अभिनयाने आणि घायाळ करणाऱ्या सौंदर्याने तिने सिने जगतात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. नयनताराचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. अभिनेत्रीची सिनेजगतात एवढी लोकप्रियता आहे की  लेडी सुपरस्टार म्हणूनही ओळखले जाते. सध्या नयनताराच्या चाहत्यांच्या निशाण्यावर बॉलिवूड निर्माता करण जोहर आला आहे. करण जोहरच्या एका वक्तव्याने हा सगळा वाद निर्माण झाला आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण चला जाणून घेऊ. 

करण जोहर हा हिंदी सिने जगतातील लोकप्रिय निर्मातान आहे. सध्या बॉलिवूड निर्माता करण जोहरचा कॉफी विथ करण हा कार्यक्रम चांगलाच चर्चेत आहे. या कार्यक्रमात तो अनेक कलाकारांना बोलावत असतो. अलिकडेच करण जोहरच्या या कार्यक्रमात दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा रुथ प्रभूने हजेरी लावण्यात आली होती. यामध्ये समंथासोबत करण जोहरच्या चांगल्याच गप्पा रंगल्या होत्या. या कार्यक्रमात करण जोहरने समंथाचे कौतुक करताना तू दाक्षिणात्य सिने जगतातील सर्वात लोकप्रिय असल्याचे सांगितले होते. यावर समंथाने उत्तर देताना आत्ताच मी नयनतारासोबत एक चित्रपट केला आहे जी दाक्षिणात्य सिने जगतातील दिग्गज अभिनेत्री आहे असे म्हणले होते.

समंथाच्या या स्पष्टिकरणानंतर करण जोहरने ती माझ्या यादीत दिग्गज अभिनेत्री नाही असे वक्तव्य केले होते. करण जोहरच्या या वक्तव्यानंतर नयनताराच्या चाहत्यांचा संताप अनावर झाला आहे. नयनताराच्या चाहत्यांनी करण जोहरला सोशल मीडियावर ट्रोल करत चांगलेच धारेवर धरले आहे. करण जोहरच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना एका चाहत्याने ती तुमच्या यादीत स्टार नसेल कारण तुमच्या यादीत फक्त नेपोटिझम चालते असे म्हणले आहे. तर आणखी एका कलाकाराने हा करण जोहर कोन आहे म्हणत निर्मात्याची चांगलीच खिल्ली उडवली आहे. सध्या या प्रकरणाची जोरदार चर्चा होताना दिसत आहे.

हेही वाचा –

महागड्या गाड्या अन् कोटींचा बंगला! ‘अशी’ लाईफस्टाईल जगतो अभिनेता सुर्यासिनेमातील हिरोंपेक्षा ‘या’ खलनायकांचीच रंगते सर्वाधिक चर्चा, ‘जयकांत शिखरे’ यादीतला टॉपरडॉक्टर हाथी ते नट्टूकाका, यशाच्या शिखरावर असतानाच ‘या’ लोकप्रिय कलाकारांनी घेतला जगाचा निरोप 

हे देखील वाचा