Sunday, June 8, 2025
Home मराठी अरे व्वा! ‘या’ तारखेपासून पाहायला मिळणार मराठमोळ्या अनुजा साठेच्या ‘एक थी बेगम’ वेबसीरिजचा दुसरा भाग

अरे व्वा! ‘या’ तारखेपासून पाहायला मिळणार मराठमोळ्या अनुजा साठेच्या ‘एक थी बेगम’ वेबसीरिजचा दुसरा भाग

आजकाल चित्रपटांपेक्षाही वेबसीरिजला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. कोरोना काळात तर वेबसीरिज मोठ्या संख्येने पाहिल्या गेल्या आहेत. अशातच एक मोठी बातमी समोर आली आहे की, ‘एक थी बेगम’ या वेबसीरिजच्या दुसऱ्या भागाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या सीरिजच्या पहिल्या भागात अभिनेत्री अनुजा साठे दिसली होती. दुसऱ्या भागात देखील तिचे खूप रंजक पात्र पाहायला मिळणार आहे. या सीरिजचा ट्रेलर अनुजाने सोशल मीडियावर शेअर करून तिच्या चाहत्यांना ही बातमी दिली आहे.

अनुजाने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून ‘एक थी बेगम’ या वेबसीरिजच्या दुसऱ्या भागाचा ट्रेलर प्रदर्शित केला आहे. यामध्ये वेबसीरिजमधील कलाकार काही डायलॉग म्हणताना दिसत आहेत. हा ट्रेलर शेअर करून तिने लिहिले आहे की, “जिसकी है सबको तलाश, वही है सबसे बडा राज, आखिर कौन है लीला पासवान.” ‘एक थी बेगम’ ही वेबसीरिज आपल्याला ३० सप्टेंबरपासून एमएक्स प्लेअरवर पाहण्यास मिळणार आहे. (Anuja sathe’s ek thi begam web series trelar release)

तिने शेअर केलेल्या या ट्रेलरवर अभिज्ञा भावेने कमेंट केली आहे की, “माय बेगम इज बॅक.” तसेच तिचे अनेक चाहते देखील या पोस्टवर कमेंट करत आहेत.

या वेबसीरिजच्या पहिल्या सिझनमध्ये अशरफच्या आयुष्यावर भाष्य करण्यात आले आहे. ज्यात तिचा पती झहीर, एकेकाळी अंडरवर्ल्ड डॉन मकसूदचा विश्वासू होता, जो मारला गेला. त्यानंतर अशरफ सपना या नावाने बार डान्सर बनून झहीरच्या हत्येसाठी जबाबदार ठरलेल्या प्रत्येकाला मारण्याची योजना आखते. मात्र, तिच्या योजना निष्फळ ठरतात आणि सिझनचा शेवट अशा एका टप्प्यावर येतो, जिथे अशरफ जिवंत राहणार की नाही, हा प्रश्न उद्भवतो. सीरिजच्या दुसऱ्या भागाची सुरुवात लीला पासवान कोण आहे,‌ या शोधाने होणार आहे.

अनुजाच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने अनेक हिंदी आणि मराठी मालिकांमध्ये काम केले आहे. तिने ‘पेशवा बाजीराव’, ‘तमन्ना’, परमाणू’, ‘झाँसी की राणी’, ‘बाजीराव मस्तानी’ या हिंदी चित्रपटात आणि मालिकांमध्ये काम केले आहे. तसेच तिने मराठीमध्ये ‘व्हाट्सऍप लग्न’, ‘राखणदार’, ‘मी पण सचिन’, ‘भो भो’, ‘घंटा’, ‘मांडला दोन घडीचा डाव’, ‘लगोरी’ या मराठी मालिका आणि चित्रपटात काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘बोल्ड सीनमुळे दिला होता खालच्या पातळीची महिला म्हणून टॅग’, मल्लिका शेरावतचा खुलासा

-असा क्रूर खलनायक, ज्याच्या नावात जरी ‘प्रेम’ असले, तरी चित्रपटांमध्ये ‘ते’ कधीही दिसले नाही

-‘बिग बॉस १४’ मधून अचानक प्रकाशझोतात आलेल्या राहुल वैद्याने इंडियन आयडलपासून केली करिअरची सुरुवात

हे देखील वाचा