बॉलिवूड अभिनेत्री मल्लिका शेरावत नेहमीच चित्रपटांमधील तिच्या बोल्ड सीनमुळे चर्चेत असते. याशिवाय मल्लिका शेरावत बोल्ड वक्तव्यासाठी देखील ओळखली जाते. ती अनेक मुद्यांवर मोकळेपणाने आपले मत मांडते. मल्लिकाने बॉलिवूडमध्ये पाऊल टाकताच तिने केलेल्या बोल्ड सीनमुळे तिला टीकेला सामोरे जावे लागले होते. तिने नुकताच आता एका मुलाखतीत खुलासा केला आहे की, बोल्ड सीन केल्यामुळे तिच्यावर कशाप्रकारे निशाणा साधला गेला होता.
मल्लिका शेरावत (Mallika Sherawat) हिने अलीकडेच माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला आहे की, भारतातील बोल्ड सीन्सबद्दल समाजात पुरुषप्रधान विचार आहेत. अभिनेत्रीने देखील कबूल केले की, काही काळानंतर लोकांच्या मानसिकतेत बदल झाला आहे. हेच कारण आहे की, आता अनेक अभिनेत्री न्यूड सीन करण्यास सक्षम आहेत.
खालच्या पातळीची महिला म्हणून दिली वागणूक
या सर्व आरोपांपूर्वीही मल्लिका शेरावत खूप काही बोलली आहे. तिने एकदा सांगितले होते की, २००४ मध्ये ‘मर्डर’ चित्रपटात केलेल्या बोल्ड सीनसाठी तिला खालच्या पातळीची महिला असा टॅग देण्यात आला होता. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ती समाजाच्या दुहेरी वृत्तीबद्दल स्पष्टपणे बोलली आहे.
मल्लिका म्हणाली की, “समाज महिला कलाकार आणि बोल्ड सीन करणाऱ्या पुरुष कलाकारात फरक करतो.” तिला असे वाटते की, “महिलांना अशा सीनसाठी लक्ष्य केले गेले, तर पुरुषांना या सर्व गोष्टींपासून वाचवले जाते.” पुढे बोलताना ती म्हणाली की, “हीच पुरुषप्रधान व्यवस्था आहे, जिथे महिलांना नेहमीच लक्ष्य केले जाते. मात्र, पुरुषांना नाही.” ती म्हणाली की, “हे फक्त भारतातच नाही, तर संपूर्ण जगात पाहिले जाते. पुरुष काहीही करून निघून जातात. त्यासाठी स्त्रीलाच दोषी ठरवले जाते.”
यापूर्वी तिने ‘वेलकम बॅक’च्या दिग्दर्शकाबाबत मोठा खुलासा केला होता. मल्लिका शेरावत म्हणाली होती की, दिग्दर्शकाने तिला त्याच्या गर्लफ्रेंडमुळे ‘वेलकम बॅक’ चित्रपटाच्या सीक्वलमध्ये कास्ट केले नव्हते. अभिनेत्रीने म्हटले आहे की, त्याने तिची भूमिका त्याच्या गर्लफ्रेंडला दिली. मल्लिका माध्यमांशी बोलताना कास्टिंग काऊचसह बॉलिवूडमध्ये पसरलेल्या नेपोटिझमबद्दलही बरेच खुलासे केले होते.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
चित्रपटात 17 किसींग सीन देऊन आली होती चर्चेत, खूप कठीण होता मल्लिका शेरावतचा अभिनेत्री बनण्याचा प्रवास
मल्लिका शेरावतच्या गोल्डन ड्रेसमधील फोटोने लावली सोशल मीडियावर आग, चाहतेही म्हणाले, ‘हॉलिवूड स्टाईल…’