Saturday, June 29, 2024

अनुपम खेर आणि नीना गुप्ता यांची भन्नाट केमिस्ट्री असणाऱ्या ‘शिव शास्त्री बलबोआ’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित

बॉलिवूडमधील दिग्गज आणि प्रतिभावान अभिनेते असलेल्या अनुपम खेर आणि अभिनेत्री नीना गुप्ता यांच्या नवीन आगामी सिनेमाचा ‘शिव शास्त्री बलबोआ’चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. २ मिनिट आणि ४३ सेकंदाच्या या ट्रेलरमध्ये अनुपम खेर आणि नीना गुप्ता यांची सुरेख केमिस्ट्री आणि दमदार अभिनय पाहायला मिळत आहे. ट्रेलरमध्ये दिसते की, हा सिनेमा दोन लोकांच्या आयुष्यावर भाष्य करतो.

 

View this post on Instagram

 

A post shared by Neena Gupta (@neena_gupta)

अमेरिकेमध्ये दोन वेगळ्या परिस्थितून आलेल्या व्यक्ती भेटतात. एकीकडे अनुपम खेर रिटायर्ड बॉक्सिंग कोच आहे तर दुसरीकडे नीना गुप्ता या बार चालवणाऱ्या स्त्रीची भूमिका साकारत आहे. ट्रेलरमध्ये बॉक्सिंगसाठी अनुपम खेर यांची आवड स्पष्ट दिसून येते. निवृत्तीनंतर अनुपम हे त्यांच्या मुलासोनट आणि नातवांसोबत राहण्यासाठी अमेरिकेला जातात. तिथे त्यांची भेट नीना गुप्ता यांच्याशी होते. नीना या मागील ८ वर्षांपासून अमेरिकेमध्ये राहत असतात, मात्र त्यांना भारतात परत यायचे असते. यातच त्यांचा पासपोर्ट आणि मौल्यवान वस्तू चोरी होतात आणि त्या अमेरिकेमध्ये अडकतात.

चित्रपटात अनुपम खेर आणि नीना गुप्ता यांच्यासोबतच जुगल हंसराज, नरगिस फाखरी, शारिब हाशमी आदी कलाकार महत्वाच्या भूमिकेत दिसत असून, अजय वेणुगोपालन यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. शिव शास्त्री बलबोआ हा सिनेमा येत्या १० फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. अनुपम खेर आणि नीना गुप्ता यांनी या सिनेमाआधी राजषी प्रॉडक्शनच्या ‘उंचाई’ या चित्रपटात एकत्र काम केले होते. यात नीना गुप्ता यांनी बोमन इराणी यांच्या पत्नीची तर अनुपम खेर यांनी बोमन इराणींच्या मित्राची भूमिका साकारली होती. याशिवाय लवकरच अनुपम खेर हे विवेक अग्निहोत्री यांच्या आगामी ‘द वॅक्सीन वॉर’ या सिनेमात महत्वाच्या भूमिकेत दिसणार असून, ते कंगना रनौतच्या ‘इमरजेंसी’ मध्ये देखील भूमिका साकारत आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक कर

हेही वाचा-
चुरा लिया है तुमने जो दिल को…! रवीना टंडनचा प्रमेता पाडणारा लूक, पाहाच फोटो
चित्रपटाच्या सेटवर दिग्दर्शकाचा अपमान करायचा सलमान खान? खुद्द कबीर खान यांनीच केला खुलासा

हे देखील वाचा