Saturday, October 19, 2024
Home बॉलीवूड अनुपम खेर यांच्यावर कोसळला दुःखाचा डोंगर; जवळच्या व्यक्तीचे झाले निधन

अनुपम खेर यांच्यावर कोसळला दुःखाचा डोंगर; जवळच्या व्यक्तीचे झाले निधन

अभिनेता अनुपम खेर (Anupam Kher) यांनी आज त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ते खूप दुःखी असून त्यांचे डोळे ओले आहेत. अनुपम यांनी अगदी जवळची व्यक्ती गमावली आहे. ती व्यक्ती म्हणजे त्यांचा चार्टर्ड अकाउंटंट होता, ज्यांचे निधन झाले आहे. अनुपम खेर त्यांना पाठक साब म्हणून संबोधताना आणि पाठक साब यांचे निधन झाल्याचे सांगताना दिसत आहेत. त्यांनी सांगितले की हे त्यांचे वैयक्तिक नुकसान आहे, कारण सीएशी त्यांचे नाते ४० वर्षे जुने आहे.

माणसाच्या आयुष्यात काही नाती हि रक्ताच्या नात्यापेक्षा मोठे स्थान निर्माण करतात. त्यांच्या अनुपस्थितीत ही भावना अधिक तीव्र होते. अनुपम खेर आज असेच भावनातीत झाले आहेत. सीएच्या निधनाची माहिती देताना त्यांचे डोळे भरून आले. अनुपम खेर यांनी सांगितले की, पाठक साब हे माझा पहिला चित्रपट आल्यापासून माझ्याशी जोडले गेले होते. ते माझे सीए तर होतेच, पण त्यांच्याकडून मला खूप काही शिकायला सुद्धा मिळाले.

व्हिडिओ शेअर करताना अनुपम खेर यांनी लिहिले की, ‘पाठक साहब महान होते, तुम्ही लोक पाठक साहबांना ओळखत नसाल. गेली ४० वर्षे ते माझे चार्टर्ड अकाउंटंट होते. काल त्यांचे निधन झाले आणि माझ्यासाठी एका युगाचा शेवट झाला. प्रामाणिकपणा, साधेपणा, शिस्त, हे सर्व पाठक साहेबांनी मला शिकवले आणि इतरही अनेक गोष्टी.

अनुपम खेर यांनी पुढे लिहिले, ‘ही त्यांना माझी श्रद्धांजली! पाठक साब यांच्याकडून मिळालेल्या सर्व शिकवणीबद्दल त्यांचे आभार, त्यांनी मला जीवनातील मूल्ये विनामूल्य समजावून सांगितली. मला तुमची खूप आठवण येईल. ओम शांती’! अनुपम खेर व्हिडीओमध्ये बोलताना दिसत आहेत, ‘जेव्हा ते मला पहिल्यांदा भेटले तेव्हा त्यांनी मला सूचना केली की मी तुमच्यासोबत तेव्हाच काम करेन जेव्हा तुम्ही नेहमीच प्रामाणिक राहाल याचं वचन द्याल.आणि मी यश मिळवल्यानंतरही तो प्रामाणिकपणा विसरणार नाही हे त्यांना वचन दिले होते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

‘तुम्ही ‘बिग बॉस मराठी 5’ का होस्ट करत नाही?; महेश मांजरेकरांनी सांगितले मोठे कारण
नॉमिनेशनची तोफ मधून घरातून बाहेर पडणार हे 6 सदस्य, जाणून घ्या यादी

हे देखील वाचा