×

अनुपम खेर यांनी फोटो शेअर करत चाहत्यांना दिली भन्नाट ऑफर, तुम्हीही घेऊ शकताय लाभ!

दिग्गज अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher) सोशल मीडियावर सतत सक्रिय असतात. सोशल मीडियावरुन ते अनेक मुद्यांवर आपले मत मांडत असतात. तसेच नवनवीन फोटो आपल्या चाहत्यांशी शेअर करत असतात. त्यांच्या या फोटोला चाहते नेहमीच जोरदार प्रतिसाद देत असतात. यावेळी अनुपम खेर यांनी फक्त आपला फक्त फोटो पोस्ट केला नाही, तर त्यासोबत चाहत्यांना एक भन्नाट ऑफरसुद्धा दिली आहे. काय आहे ही ऑफर चला जाणून घेऊ.

हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतात. आपल्या दमदार अभिनयाने त्यांनी चित्रपट जगतात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे त्यांचा चाहता वर्गसुद्धा प्रचंड मोठा आहे. ते आपले नवनवीन फोटो चाहत्यांशी शेअर करत असतात. नुकताच अनुपम खेर यांनी त्यांचा बाथटबमध्ये झोपलेला फोटो आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे. या फोटो सोबत त्यांनी चाहत्यांना अशी काही भन्नाट ऑफर दिली आहे ज्यामुळे फोटोवर प्रतिक्रियांचा पाऊस सुरू झाला आहे.

या व्हायरल फोटोमध्ये अनुपम खेर एका लाकडाच्या बाथटबमध्ये झोपलेले दिसत आहेत. एखादे बाळ आपल्या आईच्या गर्भात असल्यावर ज्याप्रमाणे दिसते तसेच ते या फोटोत झोपले आहेत. या फोटोला शेअर करत ते म्हणतात की, “हा फोटो मला खूप आवडला आहे. तुम्हालाही आवडला असेल. या फोटोसाठी मला सर्वात चांगला कॅप्शन पाहिजे. ज्यांचा कॅप्शन मला आवडेल त्या पाच जणांना मी माझ्या घरी बोलवणार आहे.” त्यांच्या या भन्नाट ऑफरनंतर चाहत्यांनी या फोटोवर अफलातून प्रतिक्रियांचा पाऊस पाडला आहे.

View this post on Instagram

A post shared by Anupam Kher (@anupampkher)

चाहत्यांनी या ऑफरला मनावर घेत दर्जेदार कॅप्शन देण्यास सुरुवात केली आहे. ज्यामध्ये एका युजरने “आपण असचं जन्मलो, आणि एक दिवस असेच जाणार, धडा आयुष्याचा,” असे भावनिक कॅप्शन सुचवले आहे. तर आणखी एकाने “आईच्या गर्भात असल्याचा अनुभव घेण्याचा प्रयत्न,” अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर दुसर्‍या एका युजरने “जगातील सर्वात सुरक्षित जागा” अशी सुंदर प्रतिक्रिया दिली आहे. थोडक्यात अनुपम खेर यांच्या या भन्नाट ऑफरचा लाभ घेण्यासाठी प्रत्येक चाहता उत्सुक आहे.

हेही वाचा –

Latest Post