×

निया शर्माच्या ‘या’ व्हायरल फोटोने वाढवली चाहत्यांची चिंता, तुम्हा पाहिला का फोटो?

टीव्ही कलाकारांमध्ये सर्वात बोल्ड आणि हॉट अभिनेत्री म्हणून निया (Nia Sharma) शर्माच्या नावाचा समावेश होतो. निया सोशल मीडियावर सतत चर्चेत असते. आपले बोल्ड आणि हॉट फोटो ती चाहत्यांशी करत असते. तिच्या या मादक सौंदर्याने तिचे चाहते चांगलेच घायाळ होत असतात. मात्र आता नियाने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोमुळे तिच्या चाहत्यांना तिची चिंता वाटू लागली आहे. काय आहे नेमक या फोटोत चला जाणून घेऊ.

अभिनेत्री निया शर्मा नेहमीच फिट राहण्यासाठी प्रयत्न करत असते. आपल्या सोशल मीडियावर ती नेहमी आपले वर्कआउट करतानाचे फोटो शेअर करत असते. यामध्ये बर्‍याचदा ती सेल्फी काढून पोस्ट करत असते. आता नुकताच नियाने आपला एक सेल्फी सोशल मीडियावर स्टोरीमध्ये पोस्ट केला होता. ज्यामध्ये ती बिना मेकअपची घामाघूम झालेली दिसत आहे. आपल्या केसांना मागे बांधुन नियाने काळ्या रंगाच्या टी शर्टमध्ये हा फोटो काढला आहे. या फोटोत निया खूपच बारीक दिसत आहे ज्यामुळे तिच्या चाहत्यांना चिंता वाटत आहे.

Photo Courtesy: Instagram/niasharma90

याआधी काही दिवसापूर्वी नियाने आपला फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. ज्यामध्ये ती खूपच हॉट आणि बोल्ड दिसत होती. नियाचे हे फोटो पाहून चाहते फिदा झाले होते. नियाच्या या फोटोवर चाहत्यांनी लाईक्सचा पाऊस पाडला आहे. आतापर्यंत या फोटोला ११ लाख पेक्षा जास्त लाइक्स आले आहेत. या फोटोवर चाहत्यांनी जोरदार प्रतिक्रिया सुद्धा दिल्या आहेत. ज्यामध्ये एका चाहत्याने “कोणी इतकं सुंदर कस काय असू शकतं,” असा प्रेमळ प्रश्न विचारला आहे. तर आणखी एकाने “आग लावली मॅडम” अशी भन्नाट प्रतिक्रिया दिली आहे. या फोटोवर अनेकांनी “सेक्सी”, “हॉट” अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. थोडक्यात नियाच्या या फोटोने सगळ्यांना वेड लावले आहे.

View this post on Instagram

A post shared by Nia Sharma (@niasharma90)

अभिनेत्री निया शर्माचे सोशल मीडियावर खूप मोठा चाहता वर्ग आहे. तिचे सोशल मीडिया अकाऊंटवर फक्त हॉट आणि बोल्ड फोटोंचा तडका पाहायला मिळतो. नियाचे इंस्टाग्रामवर तब्बल ७ मिलियन फॉलोअर्स आहेत. याउलट ती स्वतः फक्त २४३ लोकांना फॉलो करते.

हेही वाचा –

हेही पाहा-

Latest Post