Saturday, July 6, 2024

‘तुझ्यासारखे लोक कोणत्याही थराला जाऊ शकतात’, अनुपम खेर यांच्याकडून महिला पत्रकाराची खरडपट्टी

बॉलिवूड अभिनेत्री आणि भारतीय जनता पक्षाच्या खासदार किरण खेर या दिवसात कर्करोगाचा सामना करत आहेत. त्यांचे पती आणि बॉलिवूड अभिनेता अनुपम खेर यांनी एप्रिल महिन्यात या गोष्टीचा खुलासा केला आहे. किरण यांच्यावर मुंबई येथे उपचार चालू आहे. नुकतेच अनुपम खेर यांनी त्यांच्या पत्नीच्या तब्बेतीची माहिती दिली आहे की, त्यांच्या तब्बेतीत बरीच सुधारणा झाली आहे. परंतु त्यांना अजूनही सर्वांच्या आशीर्वादाची गरज आहे. यानंतर अनुपम खेर हे पुन्हा एकदा एका ट्विटमुळे चर्चेत आले आहेत. या ट्विटमधून त्यांनी एका पत्रकाराला चांगलेच सुनावले आहे.

अनुपम खेर यांनी त्यांच्या ट्विटवरून एका महिला पत्रकाराला चांगलेच सुनावले आहे. तिने असे लिहिले होते की, किरण खेर त्यांच्या आजाराबाबत अनुपम खेर हे त्यांचे रंग बदलत आहेत. त्याच्या या ट्विटनंतर अनुपम खेर यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली आणि त्यांनी सर्वांसमोर त्याची खरडपट्टी काढली. त्यांनी ट्वीट करून या पत्रकाराच्या ट्विटला चुकीचे आणि असंवेदनशीलतेचे रूप दिले आहे.

अनुपम खेर यांनी लिहिले आहे की, “नम्रता जकारिया सारखे लोक कोणत्याही थराला जाऊ शकतात. तिने फक्त किरणच्या आजाराला एक अविश्वसनीय आणि असंवेदशील रूप दिले नाही, तर या परिस्थितीचा फायदा घेऊन तिने एका गिधाडाप्रमाणे इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. तिने केलेल्या वक्तव्यावर तिच्याकडे काहीच पुरावा नाहीये, तिला लाज वाटली पाहिजे.”

काही दिवसांपूर्वी अशी अफवा पसरली होती की, अनुपम खेर यांचे निधन झाले आहे. अशी बातमी आल्यानंतर त्यांनी दुःख व्यक्त केले होते. त्यांनी सांगितले “या अशा बातम्यांमुळे केवळ मलाच नाही तर माझ्या कुटुंबाला देखील खूप त्रास झाला आहे.”

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा