Saturday, June 29, 2024

वयाच्या ६६ व्या वर्षीही अनुपम खेर गाळतायत जिममध्ये घाम; व्हिडिओ पाहून चाहतेही झाले हैराण

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अनुपम खेर सध्या आपल्या एका व्हिडिओमुळे खूपच चर्चेत आहेत. नुकतेच त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. तो पाहिल्यानंतर चाहते पुरते हैराण झाले आहेत. अनुपम ६६ वर्षीय आहेत, आणि या वयातही ते जिममध्ये घाम गाळताना दिसतायत. त्यांचा हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.

अनुपम यांनी अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर आपला वर्कआऊट व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये ते शोल्डर प्रेस करताना दिसत आहेत. (Anupam Kher New Workout Video Amazed His Fan And Video Went Viral)

हा व्हिडिओ शेअर करत त्यांनी लिहिले की, “एकप्रकारे आपण म्हणू शकतो की, आपला विश्वास मसल्सप्रमाणे असतो. तुम्ही याचा जितका वापर करता, हे तितकेच मजबूत होते.”

अनुपम यांचा हा व्हिडिओ पाहून त्यांचे चाहते खूपच इम्प्रेस झाले आहेत. त्यांच्या या व्हिडिओवर चाहते तसेच कलाकारही लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडत आहेत.

अनुपम यांच्या व्हिडिओवर कमेंट करत हरिहरन यांनी लिहिले की, “व्वा, व्वा!” एका चाहत्याने कमेंट करत लिहिले की, “शानदार सर. तुम्ही नेहमीच युवा पिढीला प्रेरित करता.”

अनुपम यांना बॉलिवूडमध्ये काम करत ३७ वर्षे झाली आहेत. त्यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर ते लवकरच अहाना कुमरासोबत ‘हॅप्पी बर्थडे’ या शॉर्ट फिल्ममध्ये स्क्रीन शेअर करताना दिसतील. त्यांनी २०१९ मध्ये आलेल्या ‘द ऍक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’मध्ये एकत्र काम केले आहे. याव्यतिरिक्त अनुपम यांच्या आगामी चित्रपटांमध्ये ‘द लास्ट शो’, ‘मुंगीलाल रॉक्स’ आणि ‘द काश्मीर फाईल्स’सह इतर अनेक चित्रपटांचा समावेश आहे.

अनुपम यांनी सन १९८२ मध्ये आलेल्या ‘आगमन’ या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-घटस्फोटानंतर आमिर अन् किरण मुलासोबत झाले एअरपोर्टबाहेर स्पॉट; व्हिडिओ व्हायरल

आनंदाची बातमी! अभिनेत्री नयनताराने केली साखरपुड्याची पुष्टी; जाणून घ्या कोण आहे तो नशीबवान?

सोनू अभिनेत्रीसोबत करत होता ‘तुम तो ठहरे परदेसी’ गाण्यावर डान्स; मध्येच आला चाहता आणि…

हे देखील वाचा