बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर (Anupam kher) एक उत्कृष्ठ अभिनेता मानले जातात. पण आज त्यांना मिळालेलं यश हे त्यांनी मोठ्या मेहनतीनं कामावलं आहे. अनुपम खेर सोशल मीडियावर नेहमी अॅक्टीव्ह असतात. दरवेळेस अनोखे व्हिडीओ शेअर करत असतात. त्यामध्ये कधी मजेशीर, तर कधी भावनिक व्हिडीओ तर काही व्हिडीओमध्ये आपलं परखडं मत मांडताना दिसतात. नुकतंच त्यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यांचा हा व्हिडीओ पाहून संमिश्र कमेंट्स पाहायला मिळत आहे.
नुकतचं अनुपम खेर यांनी शेअर केलेला व्हिडीओ मुंबईच्या रोडवर विकणाऱ्या वयस्कर सेल्समनचा आहे. यामध्ये अनुपम त्याच्याशी संवाद साधताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना अनुपम यांनी भावनिक संदेश दिला आहे.
काय आहे व्हिडीओमध्ये?
या व्हिडीओमध्ये एक वृद्ध व्यक्ती रस्त्यावर कंगवा विकून आपल्या पोटाची खळगी भरत असल्याचे पाहायला मिळते. या वृद्ध व्यक्तीचे नाव राजू असं आहे. रस्त्यावर कंगवा विकताना त्यांची भेट अनुपम खेर यांच्याशी होते. यावेळी अनुपम खेर त्यांच्याशी संवाद साधतात. त्यावेळी राजू यांचा वाढदिवस असल्याचे अनुपम यांना समजते. त्यावेळी ते राजू यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात.
त्यावेळी राजू अनुपम खेर यांना कंगवा देतात. तेव्हा अनुपम माझ्याकडे केसच नाहीत तर मी कंगवा घेऊन काय करु? असा मजेशीर प्रश्न विचारतात. तर तुम्ही एक कंगवा घेतल्याने माझे सगळं कंगवे विकले जातील अस उत्तर राजू त्यांना देतात. त्यावेळेस मोठ्या मनाने अनुपम कंगवा घेतात.
हा व्हिडीओ शेअर करत त्यांनी काही गोष्टी सांगितल्या आहेत. ‘राजू मुंबईच्या रस्त्यांवर कंगवा विकतो. माझ्याकडे कंगवा विकत घेण्याचे कारण नाही. पण त्यांचा वाढदिवस होता आणि त्यांना वाटले की, जर मी त्यांचा कंगवा विकत घेतला तर त्यांच्यासाठी चांगली सुरुवात होईल. मला खात्री आहे की त्यांनी देखील त्यांच्या जीवनात चांगले दिवस पाहिले असतील. त्यांचा हसमुख चेहरा कुणाच्याही चेहऱ्यावर हसु उमटवेल. जर तुम्ही त्यांना कधी भेटलात तर तुम्हाला गरज असो वा नसो, नक्कीच एक कंगवा खरेदी करा. त्यांचे स्मित आणि सकारात्मकता तुमचा दिवस चांगला बनवेल.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
स्कायडायविंग करत 13,000 हजार फूटावरुन ‘योद्धा’ चे पोस्टर लॉन्च; सिनेसृष्टीत पहिल्यांदाच…
ना विक्की ना सासर अंकिताने आजी अन् आईसोबत साजरा केला व्हॅलेंटाईन डे; घटस्फोटाच्या चर्चेला उधाण