सध्या चित्रपट जगतात सगळीकडे फक्त ‘द काश्मिर फाइल्स’ चित्रपटाची चर्चा रंगली आहे. चित्रपटाला आत्तापर्यंत जोरदार यश मिळाले आहे. अगदी प्रदर्शनाच्या आधीपासूनच हा चित्रपट सगळीकडे चर्चेत होता. दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांनी साकारलेल्या या चित्रपटाचे सगळीकडून कौतुक होत आहे. आता या चित्रपटातील प्रमुख अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher) यांनी अनेक खुलासे केले आहेत.
विवेक अग्निहोत्री यांच्या ‘द काश्मिर फाइल्स’ चित्रपटाने सध्या देशभरातील प्रेक्षकांना आकर्षित केले आहे. हा चित्रपट १९९०च्या काळात काश्मिरी पंडीतांवर झालेल्या अन्याय, अत्याचारावर उघडपणे भाष्य करणारा आहे. चित्रपटाच्या कथेचे सध्या जगभरातून कौतुक केले जात आहे. चित्रपटातील अभिनेते अनुपम खेर यांनी एका मुलाखतीत बोलताना अनेक खुलासे केले आहेत. या चित्रपटात अनुपम खेर यांनी काश्मिरी पंडीताची भूमिका साकारली आहे. याबद्दल बोलताना त्यांनी लोकांंना कधीही सत्य जाणून घ्यायचे नसते, त्यांना नेहमीच सत्यापासून दूर पळायचे असते, असे म्हटले आहे.
याबद्दल बोलताना अनुपम खेर म्हणाले की, “सत्य हेच आहे की, आम्ही विश्वविद्यालयाचे नाव बदलले आहे. आम्ही त्या ठिकाणी आजादीचे गाणे ऐकले, टुकडे टुकडे शब्द ऐकला, तरुण पीढीला याचा मोठा त्रास सहन करावा लागला आहे. ते निवृत्तीच्या वयात आले आहेत तरी तिथेच आहेत.” असे स्पष्ट मत यावेळी त्यांनी व्यक्त केले.
या मुलाखतीत अनुपम खेर यांच्यासोबत दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री आणि पल्लवी जोशी सहभागी झाले होते. यावेळी दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी चित्रपट तयार करताना आलेल्या अनेक अडचणींचाही पाढा वाचला. यावेळी त्यांनी तब्बल ७०० काश्मिरी पंडितांच्या मुलाखती घेतल्याचे सांगितले. दरम्यान हा चित्रपट सध्या चित्रपटगृहात प्रचंड गाजत आहे. अनेक राज्यांनी चित्रपटाला करमुक्त करण्याचाही निर्णय घेतला आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा –