रीमा लागूंच्या अभिनयाने श्रीदेवीलाही फुटलेला घाम, सिनेसृष्टीतील आपली ताकद वापरत केले होते ‘हे’ काम

रीमा लागू (Reema Lagoo) या हिंदी चित्रपट जगतातील एक असे असामान्य व्यक्तिमत्व होत्या, ज्यांच्या अजरामर अभिनयाची आजही चर्चा होेत असते. आपल्या संपूर्ण अभिनय कारकिर्दित त्यांनी अनेक प्रतिभावान भूमिका साकारल्या होत्या, त्यामुळेच त्यांच्या काळातील प्रत्येक चित्रपटाला प्रेक्षक आजही पसंती दर्शवत असतात. रीमा लागू आपली प्रत्येक भूमिका इतकी मन लावून करायच्या की, त्यांचा कसदार अभिनय पाहून चित्रपटातील मुख्य भूमिकेत असलेल्या अभिनेत्रींनाही त्यांचा हेवा वाटायचा. असाच एक किस्सा अभिनेत्री श्रीदेवी (Sridevi) आणि रीमा लागू यांच्याबाबतीत घडला होता. रीमा यांची २१ जून रोजी जयंती साजरी केली जाते. त्यांच्या जयंतीनिमित्त जाणून घेऊया श्रीदेवी अन् रीमा लागू यांच्याविषयीचा हा किस्सा…

रीमा लागू यांच्या अभिनयाची खासियत म्हणजे त्या आपली प्रत्येक भूमिका अशी निभावायच्या की, त्यांच्या अभिनयाचे सगळीकडे कौतुक व्हायचे. त्यांचा हा दमदार अभिनय चित्रपटातील प्रमुख अभिनेत्रीपेक्षाही सरस असायचा त्यामुळे अनेकदा त्यांच्या अभिनयाने मोठमोठ्या अभिनेत्रींना हेवा वाटायचा. असाच एक किस्सा ‘गुमराह’ चित्रपटाच्यावेळी घडला होता जेव्हा त्यांच्यासोबत श्रीदेवीने काम केले होते.

रीमा लागू यांचा अभिनय पाहून श्रीदेवीला प्रचंड दडपण आले होते. इतकेच नव्हेतर त्यांनी रीमा लागू यांचे अनेक सीन कट करण्यासही सांगितले होते. यावेळी श्रीदेवी हिंदी चित्रपटातील प्रमुख कलाकार होत्या त्यामुळे त्यांचा शब्द मोडण्याची कोणाच्यातही हिंमत नव्हती.

हिंदी चित्रपट जगतातील प्रसिद्ध आणि दमदार अभिनेत्री म्हणून रीमा लागू यांचे नाव आजही घेतले जाते. त्यांचे खरे नाव नयन भडभडे असे होते. त्यांची आई मंदाकिनी या मराठी चित्रपट जगतातील प्रसिद्ध अभिनेत्री होत्या. त्यामुळेच त्यांना लहानपणीच अभिनयाची आवड निर्माण झाली होती. आपल्या २५ वर्षाच्या कारकिर्दित त्यांनी अनेक कलाकारांच्या आईची भूमिका साकारली होती. यामध्ये सगळ्यात वेळा त्यांनी सलमान खानची आई म्हणून पडद्यावर काम केले आहे. सलमान खानशिवाय त्यांनी अजय देवगण, शाहरुख खान, करिश्मा कपूर, संजय दत्त, गोविंदा अशा अनेक दिग्गज अभिनेत्यांच्या आईची भूमिका साकारली आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

Latest Post