सेलिब्रिटीचे लग्न हा नेहमीच चर्चेचा विषय बनत असतो. गेल्या कही दिवसांपासून मनोरंज क्षेत्रामध्ये लग्नसराई सुरु झाली असून अनेक जोडपे लग्नबंधनात अडकले आहेत. आता नुकतंच छोट्यापडद्यावरील प्रसिद्ध अभिनेता शरद राना याने त्याची गर्लफ्रेंड केतकी वालावलकर हिच्यासोबत लग्नगाठ बांधली आहे. मात्र, ही जोडी जरा हटकेच आहे, कारण शरदने तब्बल 43 व्या वर्षी दुसरं लग्न केलं आहे.
‘कुंमकुंम भाग्य’ फेम अभिनेता शरद राना (Sharad Rana) याने 43 व्या वर्षी दुसरं लग्न करुन चाहत्यांना आनंदाचा बातमी दिली आहे. ‘अनुपमा‘ मालिकेची दिग्दर्शिका केतकी वालावलकर (ketaki walawalkar) हे दोघे अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते. केतकीची आणि शरदची ओळख मालिकेच्या सेटवरच झाली होती. हळूहळू दोघांची मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले आणि या जोडप्याने (दि, 4, जानेवारी) रोजी लग्नगाठ बांधली. या विवाहसोहळ्यामध्ये छोट्या पडद्यावरील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती.

mridulaoberoi
Verified
M R I D U
सांगायचे झाले तर, शरद राना याने 2010 साली पहिले लग्न केले होते मात्र, यांचे लग्न फार काळ टिकले नाही. आणि 2013 साली शरदने त्याच्या पूर्व पत्नीपासून घटस्फोट घेतला. मग काही दिवसानंतर शरद आणि केतकीची भेट झाली आणि दोघांनी एकमेकांना डेट केल्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला.
View this post on Instagram
View this post on Instagram
शरद आणि केतकीच्या लग्नामधील अनेक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे, यांचा लग्नसोहळा अगदी मराठमोळ्या पद्धतीने थाटामाटात पार पडला. केतकीने पिवळ्या रंगाची साडी परिधान केली होती तर शरदने पांढऱ्या रंगाचा कुर्ता परिधान केला होता. या दोघांची जोडी खूपच सुंदर दिसत आहे. शरद आणि केतकीने आपल्या नवीन आयुष्याची सुरुवात केली आहे. त्याशिवया सोशल मीडियावरील चाहते देखिल यांच्या फोटोंवर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अक्षया आणि हार्दिक यांच्या लग्नाला एक महिना पूर्ण, गोव्याला जाऊन केले फोटो शेअर
अपने दिवाने का करदे बुरा हाल! रवीना टंडनचे नवीन फोटोशुट