उर्फी जावेद ही एक अशी टीव्ही अभिनेत्री आहे जी आपल्या बोल्ड वेशभूषामुळे कायमच चर्चेत असते. अलीकडेच उर्फीने तिचा टाॅपलेस व्हिडिओ तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर शेअर केला, ज्यामुळे तिला प्रचंड ट्राेलरचा सामणा करावा लागला. आता या ट्राेलर्सच्या यादीमध्ये छाेट्या पडद्यावरील प्रिसिद्ध अभिनेत्याचं नाव सामिल झाले आहे. ताे दुसरा काेणी नसुन ‘वनराज शाह‘ अर्थात ‘अनुपमा‘ या हिट मालिकेतील सुधांशू पांडे आहे. ज्याने उर्फीला सोशल मीडियावरील त्याच्या पोस्टवर असे काही लिहिले की, उर्फी स्वत:ला थांबवूच शकली नाही आणि ‘वनराज’ला चाैख उत्तर देत त्याची बाेलती बंद केली.
उर्फी जावेद (urfi jawed) हिने नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्याद्वारे तिने सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या व्हिडिओमध्ये उर्फी टॉपलेस बसली आहे आणि एका हाताने तिचे स्तन झाकण्याचा प्रयत्न करत आहे.
View this post on Instagram
आपल्या स्टाेरीवर हा व्हिडिओ शेअर करत सुधांशू पांडे म्हणजेच वनराज शाह यांनी लिहिले की, “मी या व्यक्तीला फॉलो करत नाही, पण तरीही मला अशा भयानक गोष्टी रोज पहाव्या लागतात आणि याचे कारण म्हणजे सर्व भारतीय वृत्तवाहिन्या. हे पाहून मला खूप राग येतो! दिवाळीसारख्या पवित्र प्रसंगी तुम्ही सर्वजण अशा बिनधास्त विनोदांना प्रोत्साहन कसे देऊ शकता? देवाला तरी घाबरा, आज लक्ष्मीपूजनाचा दिवस आहे!”
उर्फीने ही स्टाेरी पाहिली आणि त्यानंतर तिने तिच्या इंस्टाग्राम स्टाेरीवर शेअर करत चाैख उत्तर दिले. उर्फीने लिहिले की, “तुम्ही या भयानक गोष्टी पाहतात कारण तुमचे या जगावर नियंत्रण नाही. मला बघायला आवडत नाही हे जगाला सांगणारे तुझ्यासारखे पुरुष बघणे मला खरच आवडत नाही पण तरीही मी सहन करते ना.अनुपमामध्ये संवाद सापडत नाहीत तर विचार केला चला उर्फीशी बोलून प्रसिद्धी घेऊया. जोपर्यंत तुम्ही इंस्टाग्राम, ट्विटर, फेसबुक विकत घेण्याइतके श्रीमंत होत नाही तोपर्यंत तुम्हाला मला सहन करावे लागेल.”
मिडल फिंगर इमोजी दाखवत उर्फीने पुढे लिहिले, “बाय द वे, मी तुम्हाला इंडस्ट्रीतील कोणत्याही व्यक्ती किंवा नालायक विरोधात आवाज उठवताना पाहिले नाही जे अभिनेत्रींना त्रास देतात, त्यांचा गैरफायदा घेतात? पण माझ्या विरोधात आवाज उठवणे तुमच्यासाठी खूप महत्वाचे होते कारण मी माझ्या शरीराने जे करते ते तुमचे काम आहे!”
या व्हिडिओमध्ये उर्फी टाॅपेलस दिसत असुन समाेर ठेवलेल्या कप केकपैकी एक केक उचलुन खातना दिसत आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
अरे वाह! शिल्पानं मुलगा वियान अन् मुलगी समीषासाेबत काढली रांगाेळी, पाहा भन्नाट व्हिडिओ
जगावेगळंच! मल्लिका लवकर झोपते म्हणून बॉयफ्रेंडला असते ‘ही’ तक्रार, अभिनेत्रीचा मोठा खुलासा