Tuesday, July 9, 2024

‘अनुपमा’ उतरत्या वयात हाेणार आई? पाहा भन्नाट व्हिडिओ

अनुपमा‘ या मालिकेतील अभिनेत्री रुपाली गांगुली आणि अभिनेता गौरव खन्ना यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करण्यासाठी काेणतीही कसर साेडली नाही. या मालिकेमध्ये असे ट्विस्ट येत आहेत, ज्याने शोचा टीआरपीही सातव्या आसमानावर गेला आहे. नुकतीच ‘अनुपमा’बद्दल एक धक्कादायक बातमी समोर येत आहे, ज्याने चाहत्यांची उत्कंठा सातव्या गगनाला पाेहचली आहे.

माध्यमांतील वृत्तानुसार, लवकरच अनुज आणि अनुपमाचा मुलगा देखील शोमध्ये प्रवेश करणार आहे आणि हे पात्र दुसरे कोणीही नाही तर गौरव खन्ना (Gaurav Khanna) साकारणार आहे. याचा खुलासा गौरव खन्ना याने स्वतःच्या आणि रुपाली गांगुली (Rupali Ganguly) हिच्या एका व्हिडिओमध्ये केला आहे. रुपाली गांगुलीचा यासंबंधीचा व्हिडिओही सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

अनुपमाच्या सेटवरून व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये अनुज आणि अनुपमा लाईव्ह सेशनद्वारे चाहत्यांशी संवाद साधताना दिसले. छोट्या व्हिडीओ क्लिपमध्ये गौरव खन्ना म्हणाला, “मानचा लेक पण येईल, ज्याचे पात्र मी नंतर साकारणार आहे.” गौरव खन्नाच्या या गोष्टीवर रुपाली गांगुली हसायला लागते. दरम्यान, गौरव खन्नाचे काही फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये तो डेनिम जीन्स, लेदर जॅकेट आणि ब्लॅक गॉगल घालून पोज देताना दिसत होता. हे फोटो शेअर करत गौरव खन्ना यांनी लिहिले की, “हे काेणतेही थ्रोबॅक नाही.”

‘अनुपमा’मध्ये अनुज आणि अनुपमाच्या मुलाच्या एंट्रीबाबत निर्मात्यांनी अद्याप कोणतेही प्लानिंग  केलेले नाही. मात्र, गौरव खन्नाच्या या व्हिडिओने चाहत्यांची उत्कंठा सातव्या गगनाला पाेहचली आहे. एका यूजरने या व्हिडिओवर आश्चर्य व्यक्त करत लिहिले की, “ही ब्रेकिंग न्यूज आहे.” अशा परिस्थितीत अनुजचा तरुण अवतारही पाहायला मिळणार आहे. त्याचवेळी दुसऱ्या युजरने मागणी करताना लिहिले की, “आता तुम्ही बोललात तर लवकर आणा.”

मालिकेत सध्या रुपाली गांगुलीचा ऑनस्क्रीन मुलगा तोशूच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरचा ट्रेक सुरू आहे. अनुपमा किंजल आणि बाकीच्या कुटुंबासमोर मुलगा तोशूचे सत्य समाेर आमते आणि खूप तमाशा होतो. वनराज रागावून तोषूला घराबाहेर काढताे आणि तोषू त्याची आई अनुपमा याला जबाबदार मानतो आणि तो तिला बघून घेईल अशी धमकी देतो.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक कर
हेही वाचा-
कोण आहे हा अभिनेता? एकेकाळी रामायणात ‘लव’ची भूमिका साकारणारा, आज आहे चित्रपटसृष्टीचा आघाडी कलाकार

‘नाे शेम मूव्हमेंट’ ला साराने केला सपाेर्ट; म्हणाली, ‘मुली घाबरुन किंवा स्व:ताच्या…’

हे देखील वाचा