Sunday, June 23, 2024

‘अनुपमा’ फेम रुपाली गांगुलीची रियल लव्हस्टोरी आहे खास, प्रेमासाठी नवऱ्याने सोडली होती गलेगठ्ठ पगाराची अमेरिकेतील नोकरी

स्टार प्लस वाहिनीवरील शो ‘अनुपमा’ने अल्पावधीतच खूप लोकप्रियता मिळवली आहे. दर आठवड्याला हा शो टीआरपीच्या यादीत टॉपमध्ये येतो. शोमध्ये येणाऱ्या ट्विस्ट आणि टर्न्समुळे या शोबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता कायम आहे. या मालिकेतील अनुपमा, वनराज, अनुज कपाडिया आणि काव्या या पात्रांना खूप प्रेम मिळत आहे. चाहत्यांना शोची कथा खूप आवडते. हा शो वयाच्या चाळिशीनंतर होणाऱ्या प्रेमावर आधारित आहे. ज्यामध्ये अनुपमाची भूमिका साकारणारी अभिनेत्री रुपाली गांगुली हिला तिचा पती वनराज फसवून काव्याशी लग्न केले. करतो. पण ही तर एक काल्पनिक मालिका आहे. प्रत्यक्षात पाहिल्या गेले तर, रूपालीचा खऱ्या आयुष्यातील पती खूपच प्रेमळ आणि अगदी पत्नीव्रता पती आहे. जाणून घ्या रुपालीची खऱ्या आयुष्यातील खूपच रंजक प्रेमकहाणी.

असे म्हणतात की, मैत्रीपासून सुरू होणाऱ्या प्रेमाचा पाया खूप मजबूत असतो. रुपालीच्या बाबतीतही तेच झाले. रुपाली आणि तिचा पती अश्विन वर्मा यांच्या प्रेमाची सुरुवातही मैत्रीतून झाली. वर्षानुवर्षे त्यांना त्यांच्याच प्रेमाची जाणीवही झाली नाही. अश्विन आणि रूपाली एकत्र शिकत होते. शालेय जीवनापासूनच दोघांची मैत्री होती. गंमत म्हणजे दोघांच्याही घरच्यांना त्यांच्यात असलेले प्रेम समजत होतं, पण दोघांनाही ते कळलं नाही. मात्र एकदा अश्विन नोकरीसाठी अमेरिकेला गेल्यावर रुपाली आणि अश्विनला एकमेकांशिवाय राहणे असह्य झाले, आणि त्यांना त्यांच्यात असणाऱ्या प्रेमाची जाणीव झाली.

एका मुलाखतीदरम्यान रुपालीने स्वतः खुलासा केला होता की, तिचा नवरा अश्विन एका अमेरिकन कंपनीत व्हीपीच्या पदावर होता. परंतु त्याने नोकरी सोडली आणि तिच्याशी लग्न करण्यासाठी भारतात परत आला. ती म्हणाली की, “तो माझ्यासाठी अमेरिकेतील एवढी चांगली नोकरी सोडून भारतात परत आला.” रुपाली आणि अश्विनच्या नात्यासाठी त्यांचे कुटुंबीय आधीच तयार होते. त्यामुळे त्यांच्या लग्नाला कोणतीही अडचण आली नाही.

रुपाली आणि अश्विनचे ​​८ फेब्रुवारी २०१३ रोजी लग्न झाले. त्यांच्या लग्नात फक्त कुटुंबातील सदस्य आणि जवळचे मित्र उपस्थित होते. २०१५ मध्ये दोघेही एका मुलाचे आई-वडिल झाले. त्यांच्या मुलाचे नाव रुद्रांश आहे. रुपाली गांगुली अनेकदा तिचे फॅमिली फोटो फॅन्ससोबत शेअर करत असते. तिच्या अनेक फोटोंना चाहते पसंती देतात.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-Birthday: लग्नाआधी लिव्ह-इनमध्ये होती नेहा पेंडसे, तर दोन मुलींचा पिता आहे अभिनेत्रीचा पती

-टॅटूची शौकीन आहे व्हीजे बानी, ‘रोडीज’चे अनेक सीझन होस्ट करून बनलीय तरुणांच्या गळ्यातील ताईत

-दुःखद! कोरिओग्राफर शिवा शंकर यांचे निधन, बराच काळ चालू होता कोरोनाशी लढा

हे देखील वाचा