Friday, September 20, 2024
Home अन्य लोकप्रिय मालिका ‘अनुपमा’साठी रुपाली गांगुली नव्हती पहिली पसंती, ‘या’ अभिनेत्रीला केले होते फायनल

लोकप्रिय मालिका ‘अनुपमा’साठी रुपाली गांगुली नव्हती पहिली पसंती, ‘या’ अभिनेत्रीला केले होते फायनल

स्टार प्लस या वाहिनीवरील प्रसिद्ध मालिका ‘अनुपमा’ गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेची लोकप्रियता या दिवसात इतकी वाढली आहे की, तिने खूप कमी वेळात इतर टेलिव्हिजन मालिकांना मागे टाकले आहे. 2020 मध्ये सुरू झालेल्या या मालिकेने एक वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच टीआरपी यादीमध्ये मजबूत पकड निर्माण केली आहे. आता क्वचितच अशी घरे असतील, ज्यात लोक ‘अनुपमा’ला ओळखत नाहीत. शोची कथा आणि सततचे चढ-उतार प्रेक्षकांना शोशी जोडून ठेवतात. या शोच्या माध्यमातून या शोची मुख्य अभिनेत्री रुपाली गांगुलीला पुन्हा एकदा तीच प्रसिद्धी मिळाली आहे.

‘ही’ अभिनेत्री होती पहिली पसंती
पण तुम्हाला माहिती आहे का? की, रुपाली गांगुली या शोसाठी पहिली पसंती नव्हती. या भूमिकेसाठी राजन शाहींनी निवडलेली रुपाली गांगुली ही एकमेव अभिनेत्री नव्हती, हे फार कमी लोकांना माहिती आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, अभिनेत्री एमी त्रिवेदीचीही या भूमिकेसाठी राजन शाहींनी निवड केली होती.

राजन शाही यांनी निवड बदलली
मिळालेल्या माहितीनुसार, ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या टीव्ही शोमध्ये दिसलेली अभिनेत्री अमी त्रिवेदी या शोसाठी पहिली पसंती होती. एमी त्रिवेदीचे ऑडिशन पाहून राजन शाही खूप प्रभावित झाले. गोष्टी अशा रीतीने पुढे गेल्या की, शेवटी त्यांनी रूपाली गांगुलीला भूमिकेसाठी फायनल केले.

रुपाली सोशल मीडियावर असते खूप सक्रिय
टीव्ही मालिकांमध्ये साधे आयुष्य जगणारी अनुपमा खऱ्या आयुष्यात खूप स्टायलिश आणि ग्लॅमरस आहे. वयाच्या 46व्या वर्षीही ती बरीच फिट आणि सुंदर दिसते. यासोबतच ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि तिचे सुंदर फोटो चाहत्यांसोबत शेअर करत राहते. अलीकडेच, तिने तिच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त तिच्या पतीसोबतचा एक रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. ज्याला चाहत्यांकडून प्रचंड प्रेम व प्रतिसाद मिळाला होता.

‘या’ टीव्ही शोमध्ये केले आहे काम
एमी त्रिवेदीने ‘सजन रे झूठ मत बोलो’, ‘झटपट खिचडी’, ‘ये तो होना ही था’ आणि ‘इंडिया धनुष’सह इतर अनेक सुपरहिट टीव्ही शोमध्ये काम केले आहे. ‘अनुपमा’ या टीव्ही शोचा विचार केला, तर हा शो सातत्याने यादीत पहिल्या क्रमांकावर राहिला आहे.

अधिक वाचा- 
“उंदीर, किडे असलेली डाळ खायचो”; ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्यानं सांगितली तुरुंगातली धक्कादायक गोष्टी
सोज्वळ जान्हवीच्या बोल्ड फोटोंनी चुकवला चाहत्यांच्या काळजाचा ठोका, एकदा फाेटाे पाहा

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा