टेलिव्हिजनविश्वात अनेक मालिका येतात आणि जातात, मात्र अशा मोजक्याच मालिका आहेत, ज्या कायमस्वरूपी त्यांचे नाव प्रेक्षकांच्या मनावर कोरण्यात यशस्वी होतात. आजच्या घडीला टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय आणि प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलेली मालिका म्हणजे ‘अनुपमा.’ आज जिकडे तिकडे फेकत आणि फक्त ‘अनुपमा’ या मालिकेचीच चर्चा आहे. मालिका आणि मालिकेतील सर्व पात्र प्रेक्षकांच्या घरातीलच झाली आहे. इतके प्रेम त्यांना लोकांकडून मिळत आहे. आज अनुपमा आणि अनुज ही या मालिकेतील दोन पात्र तुफान गाजत आहे. त्यांचे काम देखील लोकांना खूप आवडताना दिसत आहे. ‘अनुज कपाडिया’ या भूमिकेने अभिनेता गौरव खन्नाला एक वेगळीच ओळख, लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळवून दिली आहे. टीव्ही इंडस्ट्रीमधील सर्वात मोठा अभिनेता म्हणून नवीन ओळख गौरवला याच मालिकेने दिली, मात्र तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की, या भूमिकेसाठी गौरव पहिली पसंत नव्हता. त्याच्या आधी अनेक कलाकारांना ही भूमिका ऑफर झाली, मात्र त्यांच्या नकारानंतर गौरवच्या झोळीत ‘अनुज कपाडिया’ ही भूमिका आली, आणि त्याने या भूमिकेचे सोने केले. आज या लेखातून जाणून घेऊया त्या कलाकारांबद्दल ज्यांना ‘ही’ भूमिका गौरव आधी ऑफर झाली होती.
गुरमीत चौधरी :
सर्वात आधी ही भूमिका टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील हँडसम अभिनेता असलेल्या गुरमीतकडे गेली, मात्र त्याने ‘ही भूमिका करण्यासाठी तो ‘त्या’ भूमिकेला रिलेट करू शकत नसल्याचे कारण देत नाकारली. मात्र आज या भूमिकेला मिळणारे प्रेम पाहून त्याला नक्कीच त्याच्या निर्णयाचा पश्चाताप होत असेल.
करण पटेल :
टेलिव्हिजनविश्वातील सर्वात प्रॉमिसिंग अभिनेता म्हणून करण पटेल ओळखला जातो. त्याने अनेक हिट मेकांमध्ये काम करत मोठी फॅन फॉलोविंग निर्माण केली आहे. त्याला देखील अनुज कपाडिया भूमिकेसाठी विचारणा झाली. मात्र वैयक्तिक कारणामुळे त्याने ही भूमिका नाकारली.
गौतम गुलाटी :
बिग बॉस या शोचा विजेता असलेल्या गौतम गुलाटीला तुफान लोकप्रियता मिळाली. गौतमने बिग बॉसमध्ये येण्याआधी अनेक मालिकांमध्ये काम केले. त्याला देखील अनुज कापडीयाची भूमिका ऑफर झाली होती, मात्र चित्रपटातील करिअरवर लक्ष केंद्रित करायचे कारण देत त्याने ही भूमिका नाकारली.
अरहान बहल :
एका रिपोर्टनुसार ‘मन की आवाज प्रतिज्ञा’ मालिकेत मुख्य भूमिका साकारलेल्या अरहानला देखील ही भूमिका ऑफर झाली, मात्र दुसऱ्या प्रोजेक्टमध्ये व्यस्त असल्याचे सांगत त्यानेही या भूमिकेला नकार दिला.
हेही वाचा :
आनंद शिंदे यांनी मीरा आणि जय यांना दिली गाण्याची ऑफर, आगामी काळात झळकणार एकत्र
‘भाऊने माझा केसाने गळा कापला असता’, म्हणत कुशल बद्रिकेने शेअर केला भाऊ कदमसोबतचा ‘तो’ किस्सा
अजय देवगणच्या लेकीचे बोल्ड फोटो होतायत इंटरनेटवर व्हायरल, तुम्ही पाहिले का?