बॉलिवूडचा प्रसिद्ध चित्रपट निर्माता अनुराग कश्यप बहुधा कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहतो. असेच काहीसे त्याच्या मुलीच्या बाबतीतही आहे. त्याची मुलगी आलिया कश्यप ही सुद्धा खूप प्रसिद्ध आहे. ती कायम चर्चेत असते. आलिया अनेकदा आपल्या आकर्षक अंदाजामुळे चाहत्यांना घायाळ करत असते. आलिया सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. अशातच पुन्हा एकदा आलियाचा फोटो चर्चेत आला आहे. आलियाचा हा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये, आलिया कश्यप तिचा प्रियकर शेन ग्रेगोअरसोबत दिसली आहे. ते फोटो पाहिल्यानंतर युजर्सने आलियावर निशाणा साधला आहे. युजर आलियाला जोरदार ट्रोल करत आहेत. काही यूझर्सने फोटोवर हैराण करणारी प्रतिक्रिया दिली आहे. फोटो शेअर करताना आलियाने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘तुझ्यासोबत सगळ्यात जास्त आनंदी.’ यासह तिने हार्ट ईमोजी देखील पोस्ट केले आहे. फोटोमध्ये आलिया प्रियकर शेनला मिठी मारताना दिसत आहे.
आता आलियाच्या या फोटोवर कमेंट करून युजर्स त्यांची चेष्टा करत आहेत. एका युजरने आलियाच्या फोटोवर प्रतिक्रिया व्यक्त केली आणि लिहिले, ‘या गरीब मुलासोबत तू काय करत आहेस?’
त्याच वेळी एकाने लिहिले, ‘भारतात कमतरता होती का?’ त्याचबरोबर काही लोकांनी आलियाच्या या फोटोचे कौतुकही केले आहे. दोघांच्या फोटोंवर कमेंट करताना युजरने म्हटले, ‘कपल गोल.’
आलियाने प्रियकराबरोबर फोटो शेअर करण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वीही ती बऱ्याचवेळा प्रियकराबरोबर रोमँटिक अंदाजात दिसली आहे.
आलिया ही अनुराग कश्यपची पहिली पत्नी आरती बजाज यांची मुलगी आहे. अनुराग कश्यप आणि आरती २००९ मध्ये वेगळे झाले होते. आलियाचे त्या दोघांशीही चांगले पटते.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-ईद मुबारक! ‘संजू बाबा’ने कुटुंबासोबत दुबईत साजरी केली ईद, पत्नी मान्यताने फोटो केले शेअर