सध्या मीडिया आणि बॉलिवूडमध्ये फक्त एकच चर्चा आहे आणि ती म्हणजे ‘शाहरुख खान’ आणि ‘पठाण’. पठाण हा सिनेमा प्रदर्शित झाला आणि शाहरुखने तब्बल ४ वर्षांनी दणक्यात बॉक्स ऑफिसवर, मोठ्या पडद्यावर कमबॅक केले आहे. पहिल्याच दिवशी १०० कोटींची विक्रमी करणाऱ्या पठाणने कमाईच्या बाबतीत कोटीच्या कोटी उड्डाणे घेतली आहे. पुन्हा सिनेमात दिसण्यासाठी शाहरुख खानने चार वर्षांचा काळ जरी घेतला असला तरी तो सत्कारणी लागल्याचे आता चित्र आहे. शाहरुखचा सिनेमा पाहून प्रेक्षकांसोबतच अनेकांनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. यातच बॉलिवूडमधील हुशार दिग्दर्शक म्हणून ओळख मिळवलेल्या अनुराग कश्यप यांनी देखील शाहरुख खानच्या कौतुकाचे पूल बांधले आहे.
View this post on Instagram
सध्या अनुराग कश्यप त्याच्या आगामी डीजे मोहब्बत या सिनेमासाठी सतत चर्चेत आहे. याच सिनेमाच्या प्रमोशनदरम्यान त्याला शाहरुखबद्दल विचारले असता त्याने त्याची भरभरून स्तुती केली. एका मुलाखतीदरम्यान त्याने सांगितले की, “शाहरुख खान प्रत्येक गोष्टीवर नेहमीच शांत राहिला आणि आपल्या नव्या सिनेमातून ‘पठाण’मधून त्याने त्याच्या अभिनयाने सर्वांचे तोंड बंद केले. शाहरुख खान जे शिकतो ते समजून घेतो. ‘पठाण’ साठी प्रेक्षक तुफान वेडे असून, खूपच उत्सुक आहेत. पठाण पाहून लोकं पुन्हा पुन्हा सिनेमा पाहायला जात आहे. सिनेमा पाहून, शाहरुख खानला पाहून, गाणी पाहून लोकं अक्षरशः नाचत आहेत. ही उत्सुकता खूपच चांगली आहे. हीच उत्सुकता मागील अनेक दिवसांपासून गायब होती. हे एक सडेतोड उत्तर आहे. टीका करणाऱ्यांना दिलेले एक सणसणीत उत्तर आहे.”
पुढे अनुराग कश्यप म्हणाला, “शाहरुख हा सर्वात मजबूत व्यक्ती आणि सर्वात लवचिकता, सचोटी असलेला माणूस आहे. तो असा माणूस जो या सर्व घडणाऱ्या गोष्टींमध्ये शांत राहिला. तो फक्त त्याच्या कृतीने पडद्यावर बोलला. हे खूपच सुंदर आहे. तो काय शिकवतो ते मला समजले आहे, ‘आपल्या कामातून बोला, उत्तरं द्या आणि फालतू गोष्टींवर बोलू नका.” तत्पूर्वी पठाण सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वी मोठा वादंग उठला होता. सिनेमातील गाणी, काही दृश्य यावरून अनेकांनी त्याला विरोध केला. सिनेमाने प्रद्रशनंतर केवळ तिचं दिवसात ३०० कोटींची कमाई केली आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
मनपाच्या गलथान कारभारामुळे ज्येष्ठ रंगकर्मींवर झाडू मारण्याची वेळ, अंशुमनने व्हिडिओ शेअर करत व्यक्त केला संताप
‘ते कळल्यावर अनेक जणांनी मला अनफॉलो केले’, म्हणणाऱ्या हेमांगी कवीची शाहरुख खानबद्दलची ‘ती’ पोस्ट व्हायरल