Tuesday, July 9, 2024

याला म्हणतात ‘तोंडात चांदीचा चमचा घेऊन जन्माला येणे’, तब्बल ‘इतक्या’ कोटींच्या घरात राहणार विराट-अनुष्काची कन्या; जाणून घ्या

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली सध्या खूप आनंदात आहे. नुकतेच हे दोघं आई, बाबा झाले आहेत. अनुष्काने सोमवारी एका मुलीला जन्म दिला आहे. ही गोड बातमी आल्यापासून सेलिब्रिटीपासून त्यांच्या फॅन्सपर्यंत सर्वच त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहे.

Virat & Anushka
Virat & Anushka

अनुष्का आणि विराट लवकरच त्यांच्या बाळाला घेऊन घरी जाणार आहेत. अनुष्का आणि विराट त्यांच्या मुलीला घेऊन मुंबईच्या त्यांच्या घरी जाणार आहेत. जाणून घेऊया त्यांच्या याच घराविषयी.

विराट, अनुष्काचे मुंबईत ५ बीएचके सी फेसिंग अपार्टमेंट आहे. अनुष्का-विराट यांच्या या अपार्टमेंटची किंमत तब्बल ३४ कोटी इतकी आहे.

Virat and Anushka
Virat and Anushka

विराटने लग्नापूर्वी म्हणजे २०१६ मध्ये मुंबईतील वरळी भागातील ओंकार-१९७३ बिल्डिंगमध्ये ५ बीएचके लग्झरी अपार्टमेंट बूक केले होते. त्याचा हा फ्लॅट ७१७१ स्क्वेअर फूट आहे. हे दोघं नेहमी त्यांच्या घराचे फोटो सोशल मीडियावर शेयर करत असतात.

दिवाळी, करवा चौथ या सणांच्या दिवशी विराट आणि अनुष्का त्यांचे त्यांच्या घरातले फोटो शेअर करत असतात. शिवाय हे दोघं त्यांच्या घरात कधी हे गार्डनिंग करतानाचे कधी टीव्ही बघतानाच असे अनेक फोटो शेयर केले आहेत.

Virushka Home
Virushka Home

अनुष्काने ११ जानेवारीला एका मुलीला जन्म दिला. विराटने सोशल मीडियावर एक पोस्ट शेयर करत याची माहिती दिली होती. शिवाय त्यांनी त्यांच्या खाजगी आयुष्याचा सन्मान करत त्यांचे आणि नवीन बाळाचे फोटो कुठेही पसरू नये अशी विनंती देखील त्यांनी माध्यमांना केली आहे.

हे देखील वाचा