कोरोना काळात मदतीसाठी सरसावले अनुष्का शर्मा आणि विराट कोहली, ‘इतक्या’ दिवसात जमवले तब्बल ५ कोटी


कोरोनाने सगळीकडेच थैमान घातले आहे. आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण येत आहे. प्रत्येकजण जीव मुठीत घेऊन जगत आहेत. यातच अनेक कलाकार हे मदतीकरता पुढे सरसावले आहेत. काहीजण थेट रस्त्यावर उतरून मदत करत आहेत, तर काही कलाकार मोहिमेद्वारे लोकांना मदत करण्यात व्यस्त आहेत. देशातील परिस्थिती पाहता विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी गरजू लोकांना मदत करण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. ज्यामध्ये त्यांनी ७ दिवसांत ७ कोटी रुपये जमा करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. त्याचबरोबर सर्वात मोठी रक्कम म्हणजेच २ कोटी स्वतः विराट आणि अनुष्का यांनी दान केली आहे.

विराट- अनुष्काच्या मदतीला लाखो लोकांनी त्यांची साथ दिली आहे. यामध्ये अवघ्या ५ दिवसात ५ कोटी जमा झाले आहेत. हे जाणून तुम्हालाही आनंद होईल. विराट- अनुष्काने या मोहिमेला नाव दिले आहे #इनदिसटुगेदर. याच मोहिमेद्वारे त्यांनी ७ दिवसांत ७ कोटी रुपये गोळा करण्याची मोहीम राबविली आहे. ज्यामध्ये त्यांना बर्‍याच प्रमाणात यशही मिळाले आहे. मोहिमेचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी पुढील २ दिवसात १.७८ कोटी रुपयांची आवश्यकता आहे.

Photo Courtesy : Instagram/anushkasharma

विराट आणि अनुष्काच्या म्हणण्यानुसार, या मोहिमेमध्ये जमा केलेली रक्कम एसीटी अनुदानाला दिली जाईल. जो याचा उपयोग गरजू लोकांना ऑक्सिजन, औषधे आणि लसीकरणाच्या सुविधा पुरवण्यासाठी करेल.

ही मोहीम सुरू करताना, विराट आणि अनुष्का म्हणाले होते की, ‘सध्या आपला देश अतिशय कठीण आणि नाजूक टप्प्यातून जात आहे. संकटात सापडलेले लोक पाहून खूप वाईट वाटत आहे. यावेळी आपण सर्वांनी एकत्र येऊन लोकांचे प्राण वाचवण्याची गरज आहे. देशाला आपल्या सर्वांची गरज आहे.’ सोमवारी विराटने कोव्हिड लस देखील घेतली आहे.

अनुष्काने देशातील कठीण परिस्थिती लक्षात घेता, यंदा आपला वाढदिवस साजरा करण्यास नकार दिला होता. ती म्हणाली होती की, ‘देशातील लोक आपला जीव गमावत आहेत. अशा परिस्थितीत वाढदिवस साजरा केला जाऊ शकत नाही.’

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-पाकिस्तानी पंतप्रधान इमरान खानसोबत लग्नबंधनात अडकणार होती रेखा, अभिनेत्रीची आई कुंडली घेऊन थेट पोहोचली होती ज्योतिषीकडे

-‘चित्रपटसृष्टीमध्ये होतो लिंगभेद’, अभिनेत्री दिया मिर्झाचा फिल्म इंडस्ट्रीवर मोठा आरोप

-‘दिल बेचारा’ चित्रपटातील काही सीनमध्ये नव्हता सुशांतचा आवाज; अभिनेत्याच्या मृत्यूनंतर ‘या’ RJ ने केली होती डबिंग


Leave A Reply

Your email address will not be published.