Tuesday, April 8, 2025
Home बॉलीवूड अथिया शेट्टीच्या पोस्टवर अनुष्काने ‘त्या’ गोष्टीवर निशाणा साधत केली भन्नाट कमेंट

अथिया शेट्टीच्या पोस्टवर अनुष्काने ‘त्या’ गोष्टीवर निशाणा साधत केली भन्नाट कमेंट

सध्या आपली संपूर्ण भारतीय टीम इंग्लंडमध्ये त्यांच्या कुटुंबासह पोहचली आहे. लवकरच इंडिया आणि इंग्लंड यांच्यामध्ये सामन्याची सिरीज सुरु होणार आहे. त्यासाठी टीम इंग्लंडमध्ये आहे. या सर्वांचे इंग्लंडमधले अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीसह केएल राहुल आणि त्याची कथित गर्लफ्रेंड अथिया शेट्टी देखील आहे. या दोघांचे अनेक फोटो ते सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट करताना दिसत आहे. या सिरीजमुळे अनुष्का आणि अथिया चांगल्या मैत्रिणी देखील झाल्या आहेत.

अथियाने तिच्या सोशल मीडियावर अकाऊंटवर नुकताच तिचा एक फोटो पोस्ट केला आहे. पोस्ट केलेल्या फोटोमध्ये तिने ग्रे रंगाचे स्वेट शर्ट आणि लेदर पॅन्ट घातली आहे. या फोटोमध्ये अथियाचा चेहरा दिसत नसला, तरी तिच्या हातात एक निळ्या रंगाचे सीपर दिसत आहे. तिच्या या फोटोवर अभिनेत्रीं अनुष्का शर्माने एक कमेंट केली आहे.

अनुष्काने तिच्या कमेंटमध्ये लिहिले की, “तू नक्कीच शेवटच्या क्षणांमध्ये फिट्सचा उद्देशाकडे जात आहे.” अनुष्काच्या या कमेंटला उत्तर देताना अथियाने लिहिले, ‘निरोप द्यावा लागला.’ अथियाचा हा फोटो एका कारमध्ये काढला आहे. तर दुसरा फोटो फक्त तिच्या ड्रिंकचा आहे. दुसऱ्या फोटोला कॅप्शन देताना तिने लिहिले, “मंडे ब्लूज.” सोबतच एक ईमोजी देखील पोस्ट केला आहे.

सध्या अनुष्का आणि विराट त्यांच्या लेकीसह इंग्लंडमध्ये खूप एन्जॉय करत आहे. याचा अंदाज तर आपण तिच्या सोशल मीडियावरील फोटोवरून लावू शकतो. काही दिवसांपूर्वी तिने एक फोटो शेअर केला होता ज्याचे क्रेडिट तिने अथिया शेट्टीला दिले होते.

सध्या इंग्लंडमध्ये सर्व टीम त्याच्या कुटुंबासोबत असताना केएल राहुल देखील त्याची कथित गर्लफ्रेंड अथियासोबत इंग्लंडमध्ये गेला आहे. अथियाने ‘हिरो’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तिने काही सिनेमात काम केले मात्र तिला अपेक्षित यश आले नाही.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-जिया खान आत्महत्या प्रकरणाची धुरा विशेष सीबीआयच्या हातात; सूरज पांचोली म्हणाला, ‘…मला शिक्षा झालीच पाहिजे’

-करिश्मासोबत नाते तोडून अभिषेकने का केले तीन वर्षांनी मोठी असणाऱ्या ऐश्वर्यासोबत लग्न? कारण ऐकून व्हाल हैराण

-लाजुन लाल झाला शाहिद कपूर, जेव्हा मीराने शेअर केले बेडरूम सिक्रेट; म्हणाली, ‘मला वाटतं तो कंट्रोल…’

हे देखील वाचा