Sunday, June 22, 2025
Home बॉलीवूड ‘जाने मेरी जानेमन, बचपन का प्यार…’ गाण्याने उडवली अनुष्काची झोप; अभिनेत्रीने शेअर केली पोस्ट

‘जाने मेरी जानेमन, बचपन का प्यार…’ गाण्याने उडवली अनुष्काची झोप; अभिनेत्रीने शेअर केली पोस्ट

सोशल मीडिया हा असा प्लॅटफॉर्म आहे, जिथे कोणीही स्टार होऊ शकतं. येथे तुम्हाला प्रसिद्धी लोकप्रियता मिळवण्यासाठी चित्रपटांमध्ये जाऊन काम करण्याची गरज नाही पडत. आजकाल तर सोशल मीडियावरील रिल्समुळे आणि व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमुळे लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वच लोकप्रिय होतात. मागील काही दिवसांपासून सहदेव दिर्दो नावाचा एक मुलगा त्याच्या गाण्याच्या हटके स्टाइलमुळे  चांगलाच चर्चेत आला आहे.

याच मुलासंदर्भात एक पोस्ट अभिनेत्री अनुष्का शर्माने शेअर केली आहे. सध्या अतिशय व्हायरल होणाऱ्या ‘जाने मेरी जानेमन, बचपन का प्यार’ गाण्यासंदर्भात असलेली तिची ही मजेशीर पोस्ट आहे. सहदेव नावाच्या मुलाने हे गाणे असे म्हटले आहे की, त्याच्या या आवाजामुळे आणि उच्चारांमुळे सहदेवचा गाण्याचा व्हिडिओ चांगलाच चर्चेत आला आहे. (anushka sharma is struggling to get the viral song bachpan ka pyaar)

हे गाणे अनुष्का शर्माला झोपू देखील देत नाहीये. याबाबत अनुष्काने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक मजेशीर मीम शेअर केले आहे. या मीममध्ये एक व्यक्ती झोपण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. मात्र सहदेवने गायलेले गाणे तो त्याच्या डोक्यातून काढू शकत नाही. या मीमसोबत अनुष्काने हसण्याचे ईमोजी देखील पोस्ट केले आहे.

सहदेव दिर्दोच्या शाळेतील शिक्षकाने २०१९ साली हा व्हिडिओ रेकॉर्ड केला होता. यात सहदेव ‘बचपन का प्यार’ गाणे गाताना दिसत आहे. सहदेवची गाणे गाताना असणारी टोन ऐकून त्याच्या आजूबाजूला असणारे सर्व हसतात. मागील काही काळापासून हा व्हिडिओ सोशल मीडियावर हिट होत आहे. बादशाहने या गाण्याचे रिमिक्स व्हर्जन शेअर केले होते. बुधवारी छत्तीसगढचे मुख्यमंत्री असलेल्या भूपेश बघेल यांनी सहदेवचा सन्मान केला आहे.

अनुष्का शर्माबद्दल सांगायचे झाले, तर याचवर्षी जानेवारीमध्ये अनुष्काने एका मुलीला जन्म दिला. मागच्या महिन्यात अनुष्का विराटची मुलगी सहा महिन्यांची देखील झाली. अनुष्काने सध्या चित्रपटांमधून ब्रेक घेतला असून, ती मुलीच्या संगोपनात व्यस्त आहे. ती शेवटची ‘झिरो’ सिनेमात दिसली होती. आता अनुष्का तिच्या ‘पाताल लोक’, ‘बुलबुल’, ‘काला’ या सेरीजच्या प्रोडक्शनमध्ये व्यस्त आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-एकेकाळी संजय दत्तवर प्रेम करायची माधुरी दीक्षित; मात्र अभिनेता जेल गेल्यानंतर बदललं सर्वकाही; असा होता ‘संजुबाबा’चा प्रवास

-अभिनेता ते साधूपर्यंत किस करण्यामुळे वादात राहिलीय शिल्पा शेट्टी; कोर्टाने जारी केला होता वॉरंट

-गौरीला ‘शक्ती : द पॉवर’मध्ये नव्हती आवडली शाहरुखची ओव्हर ऍक्टिंग; म्हणाली ‘सगळ्यात’ वाईट चित्रपट

हे देखील वाचा