Tuesday, October 22, 2024
Home बॉलीवूड कृष्ण दास यांचे कीर्तन ऐकण्यासाठी गेले विराट आणि अनुष्का; भक्तिमय व्हिडीओ झाला व्हायरल

कृष्ण दास यांचे कीर्तन ऐकण्यासाठी गेले विराट आणि अनुष्का; भक्तिमय व्हिडीओ झाला व्हायरल

बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि तिचा पती क्रिकेटर विराट कोहली एकमेकांवरील प्रेम व्यक्त करण्यात कमी पडत नाहीत. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा नेहमीच एकमेकांचा सहवास एन्जॉय करतात. ते नेहमी एकमेकांना त्यांचे महत्त्व सांगतात. आता या जोडप्याने करवा चौथचा सण अनोख्या पद्धतीने साजरा केला आहे. हे जोडपे मुंबईतील नेस्को येथे अमेरिकन गायक कृष्णा दास यांच्या कीर्तनात सहभागी होताना दिसले. या कार्यक्रमाचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे.

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांनी मुंबईत युनेस्कोमध्ये अमेरिकेच्या कृष्णा दास यांच्या कीर्तनाला हजेरी लावली. या लाईव्ह कीर्तनाचा आनंद दाम्पत्याने घेतला. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये अनुष्का देवाचे भजन गाताना दिसत आहे. विराट आणि अनुष्का टाळ्या वाजवताना एकत्र कीर्तनाचा आनंद घेत आहेत.

या व्हिडिओमध्ये दोघेही अगदी साध्या कपड्यात दिसत आहेत. व्हायरल व्हिडीओमध्ये ती क्रीम कलरच्या कॉर्ड सेटमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. तर विराट कोहली फुल स्लीव्ह टी-शर्ट, ब्लू डेनिम जीन्स आणि लाल कॅप घातलेला दिसत आहे. या व्हिडिओमध्ये दोघेही कीर्तन ऐकताना दिसत आहेत.

https://x.com/wrognxvirat/status/1848073836400726225?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1848073836400726225%7Ctwgr%5E578f7d18239186aac189e1259ce5b5133891a66a%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fwww.amarujala.com%2Fentertainment%2Fbollywood%2Fanushka-sharma-reached-with-husband-virat-kohli-to-listen-to-krishna-das-kirtan-in-nesco-mumbai-video-viral-2024-10-21

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली हे पहिल्यांदाच कीर्तन करताना किंवा धार्मिक स्थळी दिसण्याची ही पहिलीच वेळ नाही. अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांनी यापूर्वी लंडनमध्ये अशा कार्यक्रमांना हजेरी लावली आहे. दोघेही प्रेमानंद महाराजांच्या दर्शनासाठी एकत्र आले होते. दोघेही नीम करोली बाबावर विश्वास ठेवतात. वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, अनुष्का आगामी ‘चकडा एक्सप्रेस’ या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट क्रिकेटर झुलन गोस्वामीच्या जीवनावर आधारित आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा

‘पुष्पा 2’ ‘RRR’चा सारखा असणार? अल्लू अर्जुनचा चित्रपट या खास फॉरमॅटमध्ये होणार प्रदर्शित
प्रियंका चोप्राने निक जोनाससाठी केला करवा चौथचा उपवास; पतीने दिले खास गिफ्ट

हे देखील वाचा