मनोरंजन क्षेत्रातील आघाडीचा अभिनेता असणाऱ्या सिद्धार्थ शुक्लाने अचानक या जगाचा निरोप घेत सर्वांनाच मोठा धक्का दिला. केवळ ४० व्या वर्षी सिद्धार्थची अशी अचानक एक्सिट सर्वांनाच चटका लावून गेली. सिद्धार्थच्या जाण्याचा फॅन्सपासून कलाकारांपर्यंत सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. वयाच्या ४० व्या वर्षी त्याचे असे निघून जाणे सर्वांसाठीच अविश्वसनीय आणि न पचणारे आहे. टीव्हीपासून सिनेसृष्टीपर्यंत सर्वच जणं त्याच्या निधनावर त्याला श्रद्धांजली वाहताना दिसत आहे. कलाकारांच्या या आदरांजलीमध्ये अनुष्का शर्माच्या सोशल मीडिया पोस्टने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.

अनुष्काने प्रसिद्ध स्टॅन्ड अप कॉमेडियन आणि यूटुबर असणाऱ्या जाकीर खानची पोस्ट तिच्या इन्स्टा अकाऊंटवरून शेअर केली आहे. तिने जाकीरच्या पोस्टचा काही भागच शेअर केला आहे. जाकीरच्या खऱ्या पोस्टमध्ये काय लिहिले जाणून घेऊया त्याने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले की, “ते तुम्हाला माणूस समजत नसल्यामुळे कोणतीच लाईन नाहीये…ना कोणत्या मर्यादा आहेत. तुमची बॉडी त्यांच्यासाठी आत्मा निघून गेलेले शरीर नाही तर शक्य तितके फोटो घेण्याची एक संधी आहे. हे तसेच आहे जसे की दंगलींमध्ये एखाद्या जळणाऱ्या घरातून भांडे चोरण्याचा प्रयत्न करणे. कारण यानंतर तुम्ही त्यांच्या काय कमला येणार. जास्तीत जास्त १० फोटो, ५ बातम्या, ३ व्हिडिओ, १ स्टोरी आणि एक पोस्ट आणि बस संपले सर्व. यासाठीच तुमचा मृत्यू त्यांच्यासाठी एक तमाशाच राहील, रडणारी आई तमाशा, दुखणे आतून तुटलेला बाप तमाशा, बेशुद्ध बहिण तमाशा, हिंमत गमवणारे भाऊ तमाशा आणि तुमच्यावर प्रेम करणारे असंख्य लोकं त्यांच्यासाठी फक्त तमाशाच आहे. तू जिवंत असता तर गोष्ट वेगळी होता, आता तुझ्या मरणानंतर तुझे रडणारे, आक्रोश करणारे त्यांची भूक भागवणार आहे.”
या पोस्टवरून स्पष्ट लक्षात येते की, अनुष्काने मीडियावर आणि मीडियाने सिद्धार्थ शुक्लच्या केलेला कव्हरेजवर अनुष्का खूपच नाराज आहे. म्हणूनच तिने ही पोस्ट शेअर केली आहे.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-एकदम झक्कास! अनुजा साठेच्या नवीन फोटोवर श्रेया बुगडेची कमेंट; म्हणाली…