हिंदी चित्रपट जगतात अशा अनेक जोड्या आहेत ज्यांच्या केमिस्ट्रीची सगळीकडे चर्चा होत असते. या कपल्सच्या प्रेमप्रकरणाची, त्यांच्या आयुष्यातील छोट्या मोठ्या किस्स्यांची त्यांच्या चाहत्यांना नेहमीच उत्सुकता लागलेली असते. यांपैकीच एक सर्वात प्रसिद्ध जोडी म्हणजे अभिनेत्री अनुष्का शर्मा(Anushka Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohali). अनुष्का आणि विराट हे देशातील सर्वात क्युट कपल म्हणून ओळखले जाते. जितकी चर्चा त्यांच्या आत्ताच्या सुंदर केमिस्ट्रीची होत असते तितकीच चर्चा दोघांच्या प्रेम प्रकरणाचीही झाली होती. सध्या विराट आणि अनुष्काचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे ज्याची सगळीकडे चर्चा रंगली आहे.
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा दोघेही सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. विराट कोहली भारतीय क्रिकेट संघामध्ये सध्या आघाडीचा फलंदाज म्हणून दमदार कामगिरी करताना दिसत आहे तर अनुष्का शर्माही हिंदी चित्रपट जगतात लोकप्रिय ठरली आहे. त्यांचे अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये अनुष्का शर्मा तिच्या केसांची क्लिप शोधताना दिसत आहे. जेव्हा ती क्लिप शोधण्यासाठी ड्रोवर उघडते तेव्हा तो मोकळाच असतो. पुढे ता क्लिप शोशोधत दुसऱ्या खोलीत जाते तेव्हा त्या ठिकाणी विराट तिच्या क्लिपच्या मदतीने टिव्ही जवळच्या सगळ्या वायरी एकत्रित करुन बांधताना दिसत आहे. अनुष्का हा सगळा प्रकार बघते आणि विराटला काहीही न बोलता ति क्लिप घेऊन जात असल्याचे दिसत आहे. मात्र ती क्लिप घेऊन जाताच या सगळ्या वायरी अस्ताव्यस्त होतानाही दिसत आहेत. (anushka sharma shocked on virat kohli jugaad to fix wires at home lets watch video)
विराटची भन्नाट आयडिया आणि त्यावर अनुष्काने दिलेली प्रतिक्रियेचा हा व्हिडिओ सगळीकडे व्हायरल होत आहे. यामध्ये अनुष्का शर्मा बाथ गाऊन मध्ये तर विराट कोहली पंजाबी पगडी घालून खूपच गोड दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करत अनुष्काने काही कारणामुळे विराटने सामान्य क्लिपचा असा मोठा वापर केला आहे असा कॅप्शन दिला आहे. याआधी विराट आणि अनुष्काच्या मुलीचा वामिकाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा –
- सोनाक्षी सिन्हाने इव्हेंट मॅनेजरला वापरले अपशब्द, अभिनेत्रीविरुद्ध मानहानीचा खटला दाखल
- जया बच्चनने ‘ती’ अट ठेवली नसती, तर आज करिष्मा कपूर असली असती बच्चन कुटुंबाची सून
- सलमान खानने केले युलिया वंतूरच्या गाण्याचे दणक्यात प्रमोशन, प्रेमप्रकरणाच्या चर्चांना पुन्हा आले उधाण