Monday, July 1, 2024

थ्रोबॅक व्हिडिओ शेअर करत अनुष्काने सांगितल्या मागच्या वर्षीच्या लॉकडाऊनच्या आठवणी

मागच्या वर्षी आलेल्या कोरोना विषाणूने आता पुन्हा एकदा सगळीकडे थैमान मांडले आहे. पुन्हा एकदा संपूर्ण जनता त्यांच्या घरामध्ये बसली झाली आहे. मागच्या वर्षी देखील अनेक महिने त्याचा प्रभाव होता. लॉकडाऊन दरम्यान सगळेजण घरात असल्याने आता अनेक गोष्टी सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. यामध्ये बॉलिवूडमधील अनेक कलाकारांचा देखील समावेश आहे. मागील लॉक डाऊनमध्ये अभिनेत्री अनुष्का शर्माने तिचा संपूर्ण वेळ तिचा पती विराट कोहलीसोबत घालवला होता. आता तिने त्यांच्यासोबत एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करून मागच्या वर्षीच्या लॉक डाउनची आठवण करून दिली आहे.

अभिनेत्री अनुष्का शर्माने विराट कोहलीसोबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करून, त्यावर असे कॅप्शन दिले आहे की, “मागच्या वर्षीचे काही अनमोल क्षण.” यामध्ये तुम्ही पाहू शकता कि,अनुष्का शर्मा आणि विराट कोहली हे दोघेही त्यांच्या कुत्र्यासोबत खेळताना दिसत आहे.

अनुष्का शर्माला कुत्रे खूपच आवडतात. ती नेहमीच त्याच्यासोबत फोटो आणि व्हिडिओ काढून सोशल मीडियावर पोस्ट करत असते. तिने अनेक वेळा रस्त्यावर असणाऱ्या कुत्र्यांसाठी देखील आवाज उठवला आहे. तिने तिच्या कुत्र्यासोबत खेळतानाचा शेअर केलेला हा व्हिडिओ प्रेक्षकांना खूपच आवडला आहे.

यावर्षी जानेवारी महिन्यात अनुष्का शर्मा आणि विराट कोहली हे आई-वडील झाले. त्यांनी ही माहिती ट्विटरवरून दिली होती. त्यावेळी अनुष्का शर्माने ट्विट केले होते की, “मला हे सांगण्यास अत्यंत आनंद होतो की, दुपारीच आम्हाला मुलगी झालेली आहे. तुमच्या सगळ्यांच्या प्रेमाबद्दल आणि आशीर्वादबद्दल खूप खूप धन्यवाद.” अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीने त्यांच्या मुलीचे नाव वामिका असे ठेवले आहे.

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली हे दोघेही त्यांच्या वैवाहिक आयुष्यात खूप सुखी आहेत आणि मुलीच्या येण्याने त्यांचा हा आनंद द्विगुणित झालेला दिसून येतो. अजूनही अनुष्का-विराटने त्यांच्या मुलीचा चेहरा प्रेक्षकांना दाखवला नाहीये.

हे देखील वाचा