Tuesday, July 9, 2024

‘पॅकअप’ म्हणताच अनुष्का शर्माने दिली ‘अशी’ रिऍक्शन, यावर अर्जुन कपूरची कमेंट वाचून तुम्हीही व्हाल लोटपोट

अनुष्का शर्मा काही चित्रपटांनंतरच एक लोकप्रिय व्यक्तिमत्त्व बनली आणि अगदी कमी कालावधीतच तिला मोठ्या बॅनरचे चित्रपट मिळू लागले. अभिनेत्रीने बॉलिवूडच्या सर्वोच्च कलाकारांसोबत काम केले आहे आणि बऱ्याच हिट चित्रपटांचा ती एक भाग राहिली आहे. तिच्या सौंदर्याचा प्रत्येकजण दीवाणा आहे. अभिनेत्रीने यावर्षी मुलगी वामिकाला जन्म दिला आहे. आता विदेशातून परतल्यानंतर तिने पूर्ण जोमाने कामाला सुरुवात केली आहे. शिवाय अनुष्का सोशल मीडियावर देखील सक्रिय राहते. इंस्टाग्रामवर तब्बल ५२ दशलक्ष युजर्स तिला फॉलो करतात.

दरम्यान अलीकडेच अनुष्काने एका शूटचा बिहाईंड द सीन व्हिडिओ तिच्या चाहत्यांसाठी शेअर केला आहे. यामध्ये अनुष्का शर्मा मस्तीच्या मूडमध्ये दिसत आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, तिने अचानक तिचे डोके पांढऱ्या पडद्याच्या मधून बाहेर काढले आणि मोठी स्माईल देत, डोळेही मोठे केले. जणू काय तिला अचानक खूप मोठा आनंद मिळाला आहे. यानंतर अनुष्काचा क्लोज लूकही पाहायला मिळतो. (anushka sharma video makes everyone laugh arjun kapoor worried about vamika)

या व्हिडिओमध्ये अनुष्का शर्मा खूपच गोड दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिलंय, “कोणीतरी पॅकअप बोललं का?” यामध्ये तिची रिऍक्शन तशीच आहे, जशी एखादी सुट्टी मिळल्यावर आपल्या चेहऱ्यावर येते. त्याचबरोबर अनेक कलाकार तिच्या या व्हिडिओवर कमेंट करत आहेत.

तिच्या या व्हिडिओवर रणवीर सिंगने हसण्याच्या इमोजी पोस्ट केल्या आहेत. त्याचवेळी अर्जुन कपूरने अतिशय मजेदार कमेंट केली आहे. अर्जुन कपूरने म्हटले आहे की, “आशा आहे की, वामिका आजूबाजूला असताना तू अशी हसणार नाहीस.” तर कॅटरिना कैफने अनुष्काच्या केसांची प्रशंसा केली आहे.

अनुष्का शर्मा वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं, तर अखेरच्या वेळेस २०१८ मध्ये ती शाहरुख खान आणि कॅटरिना कैफ सोबत ‘झिरो’ चित्रपटात दिसली होती. यानंतर अनुष्काने आतापर्यंत कोणत्याही प्रकल्पाची घोषणा केलेली नाही. चाहते तिच्या पुढील चित्रपटाची घोषणेची वाट पाहत आहेत.

हे देखील वाचा