बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली यांनी या वर्षी फेब्रुवारी महिन्यात त्यांच्या मुलीचे या जगात स्वागत केले आहे. प्रेग्नंसी दरम्यानचे अनुष्काचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यातील सर्वांचे लक्ष वेधणारी गोष्ट होती, ती म्हणजे अनुष्का शर्माचे प्रेग्नंसीमधील कपडे. अनुष्का अनेक वेगवेगळ्या स्टायलिश कपड्यांमध्ये स्पॉट झाली होती. त्यामुळे तिच्या प्रेग्नेंसीसोबत तिचे कपडे देखील खूप चर्चेत होते. अशातच बातमी समोर आली आहे की, अनुष्काने तिच्या प्रेग्नेंसीमधील कपडे ऑनलाईन विकण्याचा निर्णय घेतला आहे. (Anushka Sharma will sell her maternity clothes)
अनुष्का शर्माने सर्क्युलर फॅशनला पाठिंबा देत हा निर्णय घेतला आहे. तिने मुलाखतीत सांगितले की, “हा एक सरळ मार्ग आहे. ज्यातून आपण एक दयाळू आयुष्य जगू शकतो. या कपड्यांना पुन्हा एकदा सर्क्युलर फॅशनमध्ये विकल्यास पर्यावरणावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो. माझ्या गरोदरपणात मला हे जाणवले की, आपले एक पाऊल सर्क्युलर इकॉनॉमीमध्ये भाग घेण्यास खूप उपयोगी ठरेल.”
अनुष्काने पुढे सांगितले की, “जरी केवळ 1 टक्के महिलांनी जरी प्रेग्नंसीमध्ये नवीन कपडे खरेदी न करता जुन्या कपड्यांचा वापर चालू केला, तर आपण एवढे पाणी वाचवू शकतो, जेवढे पाणी एक व्यक्ती 200 वर्ष पिऊ शकतो.”
सर्क्युलर फॅशन एक अशी सिस्टीम आहे, ज्यात समोरच्या मॉडेलला बघून कपडे बनवले जातात. या कपड्यांची क्वालिटी आणि टिकाऊपणा याकडे प्रामुख्याने लक्ष दिले जाते. अशाप्रकारचे कपडे बनवताना पर्यावरणाची देखील काळजी घेतली जाते.
अनुष्का आणि विराट यांनी त्यांच्या मुलीचे नाव वामिका असे ठेवले आहे. त्यांनी अजूनही त्यांच्या मुलीचा चेहरा सोशल मीडियावर कोणालाच दाखवला नाहीये. अनुष्का आणि विराट सध्या इंग्लंडमध्ये आहेत. तिने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची मॅच तिच्या बालकनीमधून पाहिली होती.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘स्लमडॉग मिलेनियर’ फेम अभिनेत्री लग्नाआधीच होणार आई; फोटो शेअर करत दिली ‘गुडन्यूज’
-अरे व्वा! ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याने रचलाय नवीन विक्रम; आठव्यांदा साकारणार ‘महादेवा’ची भूमिका