Saturday, March 15, 2025
Home मराठी ‘स्वीटू’ने केला ‘नलू मावशी’सोबत मस्ती करतानाचा व्हिडिओ शेअर, अभिनेत्री आदिती म्हणाली, ‘माझ्याकडून पण एक…’

‘स्वीटू’ने केला ‘नलू मावशी’सोबत मस्ती करतानाचा व्हिडिओ शेअर, अभिनेत्री आदिती म्हणाली, ‘माझ्याकडून पण एक…’

झी मराठीवरील ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेला प्रेक्षकांनी सुरुवातीपासूनच खूप प्रेम दिले आहे. मालिकेची कहाणी काही वेगळी असल्याने सगळ्यांनी मालिकेला खूप प्रेम दिले. मालिकेतील सगळीच पात्र प्रेक्षकांना खूप आवडतात. यातील स्वीटूच्या आईचे म्हणजेच नलू मावशीचे पात्र अनेकांना आवडते. तिचा भाबडा स्वभाव देखील अनेकांना भावतो. अशातच स्वीटू आणि नलू मावशीचा एक ऑफस्क्रीन व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये त्या दोघी खूप मस्ती करताना दिसत आहेत.

अन्विताने हा व्हिडिओ तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये नलू मावशी म्हणजेच अभिनेत्री दीप्ती केळकर खुर्चीवर बसून मोबाईल बघत असते. त्यावेळी स्वीटू म्हणजेच अन्विता फलटणकर तिथे येते आणि तिला त्रास देते असते. त्यावेळी स्वीटूची काकू शुभांगी भुजबळ व्हिडिओ काढत असते. यावेळी मस्ती करताना स्वीटूला चुकून खुर्ची लागते. यानंतर अन्विता दिप्तीला जवळ घेते. अशाप्रकारे त्यांची सेटवर मस्ती पाहायला मिळते. (anvita faltankar share a off screen video with dipti kelkar on social media)

हा व्हिडिओ शेअर करून तिने कॅप्शन दिले आहे की, “अघोरी प्रेम ओपी,” त्यांच्या या व्हिडिओवर अभिनेत्री अश्विनी केसकर हिने “मिस यू” अशी कमेंट केली आहे, तर अभिनेत्री आदिती सारंगधर हिने “माझ्याकडून पण एक कडकडून मिठी मार,” अशी कमेंट केली आहे. तसेच बाकी अनेक चाहते या व्हिडिओवर त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. मालिकेतील मायलेकीमधील ही बॉंडिंग अनेकांना खूप आवडली आहे.

‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेला सुरुवातीला प्रेक्षकांनी अमाप प्रेम दिले, परंतु मालिकेत स्वीटूचे लग्न ओमशी होण्याऐवजी मोहितशी झालेले दाखवले. त्यामुळे प्रेक्षकांनी खूप संताप व्यक्त केला होता. तसेच काही दिवसांनी मालिकेत प्रिया मराठेची एन्ट्री झाली. त्यामुळे मालिका थोडीशी रंजक वळणावर आली आहे, तरी देखील प्रेक्षकांच्या मालिकेकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण होत नसल्याने ते काही अंशी नाराज आहेत. तसेच नुकतेच हाती आलेल्या माहितीनुसार, मालिकेत काही वर्षांचा लीप दाखवला जाणार आहे. त्यामुळे मालिका आता नक्की कोणत्या वळणावर जाणार आहे, हे पाहण्यासाठी प्रेक्षक खूप उत्सुक आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘आमची गुळाची ढेप’, म्हणत प्राजक्ता माळीच्या गोड स्माईलचे आणि सौंदर्याचे होते तोंडभरून कौतुक

-आकाशी रंगाच्या साडीमध्ये ‘परमसुंदरी’ दिसणाऱ्या मिथिला पालकरचे फोटो पाहून तुम्हीही पडाल तिच्या प्रेमात

-‘गुलाबी गुलाब’ झालेल्या प्रिया बापटला पाहून हरपले चाहत्यांचे भान

हे देखील वाचा