‘गुलाबी गुलाब’ झालेल्या प्रिया बापटला पाहून हरपले चाहत्यांचे भान

मराठी चित्रपटसृष्टीत अनेक अभिनेत्री आहेत. पण काही अभिनेत्री अशा आहेत ज्यांचे केवळ नाव घेतले तरी त्यांचा चित्रपटसृष्टीतील सगळा प्रवास डोळ्यासमोर येतो. त्यांच्या कामाने त्यांनी रसिकांच्या मनात त्यांचे स्थान ध्रुव ताऱ्याप्रमाणे अढळ केले आहे. यातीलच एक म्हणजे अभिनेत्री प्रिया बापट. प्रियाने मराठी मालिका, मराठी चित्रपट, हिंदी चित्रपट, नाटक, वेबसीरिज या सगळ्या माध्यमात काम करून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. प्रेक्षक देखील नेहमीच तिच्या अभिनयाला भरभरून प्रतिसाद देत असतात. प्रिया सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. अशातच तिचे काही फोटो समोर आले आहेत.

प्रियाने सोशल मीडियावर तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तिने फिकट गुलाबी रंगाचा एक सुंदर स्लीव्हलेस ड्रेस घातला आहे. यावर तिने गुलाबी रंगाची नेटची ओढणी घेत, कानात मोठे इअरींग घालत, सगळे केस मोकळे सोडले आहेत. या फोटोमध्ये ती अगदी सुंदर आणि गोड दिसत आहे. तसेच तिने दिलखुलासपणे दिलेली स्माईल देखील सगळ्यांना खूप आवडत आहे. (marathi actress priya bapat share her beautiful photos on social media)

तिच्या चाहत्यांना देखील तिचा हा सुंदर फोटो खूप आवडला आहे. अनेकजण या फोटोवर कमेंट करून त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. तिच्या एका चाहत्याने या फोटोवर “गुलाबी गुलाब” अशी कमेंट केली आहे. तसेच बाकी अनेक चाहते या फोटोवर सातत्याने कमेंट करून तिचे कौतुक करत आहेत. तिचा हा सोज्वळ आणि गोंडस लूक सगळ्यांना खूप आवडला आहे.

View this post on Instagram

A post shared by Priya Bapat (@priyabapat)

प्रियाच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने २००३ साली ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ या चित्रपटात काम केले. त्यानंतर तिने ‘लगे राहो मुन्नाभाई’ या चित्रपटात देखील काम केले. तिने ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’, ‘आनंदी आनंद’, ‘काकस्पर्श’, ‘टाईमप्लीज’, ‘आंधळी कोशिंबीर’, ‘हॅप्पीजर्नी’, ‘टाईमपास २’, ‘वजनदार’, ‘गच्ची’, ‘आम्ही दोघी’ या चित्रपटात काम केले.

चित्रपटासोबत प्रियाने छोट्या पडद्यावर काम करून देखील प्रेक्षकांचे प्रेम मिळवले आहे. तिने ‘शुभंकरोती’, ‘अधुरी एक कहाणी’, ‘बंदिनी’, ‘दामिनी’, ‘दे धमाल’, ‘आभाळमाया’ यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. सोबतच तिने ‘मायानगरी’, ‘सिटी ऑफ ड्रीम्स’, ‘आणि काय हवं’ या वेबसीरिजमध्ये काम केले आहे. या वेबसीरिजच्या पुढच्या दोन सिझनमध्ये देखील प्रियाने काम केले आहे. ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ या वेबसीरिजमधील तिच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले आहे.

दैनिक बोंबाबोंमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘तुझी माझी जोडी जमली’, गाण्यावर मानसीने पतीसोबत धरला ठेका; पाहून तुम्हीही म्हणाल, ‘लय भारी’

-पिवळ्या रंगाच्या साडीत मितालीने दिल्या झक्कास पोझ; चाहताही म्हणाला, ‘खूप खूप जास्त सुंदर दिसताय’

-‘…खरचं साडीपेक्षा तू जास्त सुंदर दिसतेस’, श्रुती मराठेच्या फोटोवरील चाहत्यांची कमेंट ठरतेय लक्षवेधी

Latest Post