सध्या झी टीव्हीवर प्रसारित होणारी, ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ ही मालिका टीव्ही जगात धुमाकूळ घालत आहे. या मालिकेतील सर्वच कलाकार रसिकांच्या पसंतीस उतरत आहेत, मात्र ‘ओम’ अन् ‘स्वीटू’ची लव्हस्टोरीला प्रेक्षकांकडून विशेष प्रेम मिळते. त्यातील स्वीटू अर्थातच अभिनेत्री अन्विता फलटणकर सोशल मीडियावरही बरीच सक्रिय असते. तिचे फोटो व व्हिडिओ चाहत्यांकडून खूप पसंतही केले जातात.
कधी अन्विता गाताना दिसते, तर कधी एखाद्या गाण्यावर ताल धरताना दिसते. अशातच तिचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात अभिनेत्री ठुमके लावताना दिसली आहे. हा व्हिडिओ ‘मन उडू उडू झालंय’ फेम रीना मधुकरने शेअर केला आहे. यात तुम्ही पाहू शकता की, अन्विता आणि रीना आपल्या सहकलाकारांसोबत एका ट्रेंडिंग गाण्यावर थिरकताना दिसल्या आहेत. यातील त्यांच्या स्टेप्स पाहून चाहतेही बघतच राहिले.
हा डान्स व्हिडिओ शेअर करत रीनाने कॅप्शनमध्ये लिहिलंय, “कारण आम्ही ट्रेंडिंग आहोत.” प्रतिभावान स्वीटूची वेगवेगळी कौशल्ये पाहून, नेटकरी खूप प्रभावित झाल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच व्हिडिओवर चाहत्यांनी भरभरून प्रेम व्यक्त केले आहे. कमेंट्सच्या माध्यमातून चाहते तिचे कौतुक करताना दिसत आहेत.
अन्विताच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर तिने नाटकांपासून ते बऱ्याच चित्रपटामध्ये अभिनय करून, रसिकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे. तिने रवी जाधव दिग्दर्शिक ‘टाईमपास’मध्ये अभिनेत्री केतकी माटेगावकरच्या मैत्रिणीची भूमिका साकारली होती. यानंतर ‘गर्ल्स’ या चित्रपटात ती ‘रुमी’च्या भूमिकेत पाहायला मिळाली होती. याशिवाय अन्विताने ‘चतुर चौकडी’ आणि ‘रुंजी’ या मालिकेतही काम केले आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-खूपच सुंदर! परी बनून अक्षया देवधरने चाहत्यांना केलं क्लीन बोल्ड, एक नजर टाकाच
-आजही कायम आहे किशोरी शहाणेंचं सदाबहार सौंदर्य, व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल, ‘खरंच की!’
-स्टाईल आयकॉन बनत आहे सचिन पिळगावकरची लाडकी लेक; श्रियाच्या स्टाईलनेे वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष










