Tuesday, January 13, 2026
Home बॉलीवूड तारा सुतारिया आणि वीर पहाडिया यांचा ब्रेकअप? एपी ढिल्लोंमुळे तुटलं नातं

तारा सुतारिया आणि वीर पहाडिया यांचा ब्रेकअप? एपी ढिल्लोंमुळे तुटलं नातं

विरल भयानी यांच्या रिपोर्टनुसार बॉलिवूडमधील चर्चित कपल तारा सुतारिया आणि वीर पहाडिया यांचे ब्रेकअप झाल्याची चर्चा सध्या जोरात सुरू आहे. एपी ढिल्लोंच्या कॉन्सर्टमधील वादानंतर ही धक्कादायक बातमी समोर आली असून, चाहत्यांनाही यामुळे मोठा धक्का बसला आहे. रिपोर्टनुसार, तारा आणि वीर यांनी कोणताही वाद न करता शांतपणे एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, त्यांच्या ब्रेकअपमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या बातमीनंतर सोशल मीडियावर चाहत्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.

काही दिवसांपूर्वी मुंबईत पार पडलेल्या एपी ढिल्लोंच्या कॉन्सर्टमध्ये तारा सुतारिया स्टेजवर दिसली होती. या वेळी तिची आणि एपी ढिल्लोंची केमिस्ट्री चर्चेचा विषय ठरली. त्यानंतर सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला, ज्यामध्ये वीर पहाडिया नाराज दिसत होते. पुढे ओरीने या घटनेचा अनएडिटेड व्हिडिओ शेअर केल्यानंतर हा वाद आणखी चिघळला. तारा आणि एपी ढिल्लोंच्या कथित रोमँटिक क्षणांमुळे वीरला ट्रोलिंगचा सामना करावा लागला, तर काहींनी वीरच्या बाजूनेही पाठिंबा दिला.

या वादावर प्रतिक्रिया देताना वीर पहाडियाने ओरीचा व्हिडिओ शेअर करत “सत्य नेहमी जिंकतं” असे लिहिले होते. तर तारा सुतारियाने (Tara Sutaria)सोशल मीडियावर पोस्ट करत पेड पीआर, एडिटेड व्हिडिओ आणि खोट्या गोष्टी पसरवल्या जात असल्याचा आरोप केला होता. या प्रतिक्रियांवरून दोघांमध्ये थेट वाद नसल्याचे दिसून आले होते.

करीना कपूरच्या चुलत भावाशी, आदर जैनसोबत ब्रेकअपनंतर तारा सुतारियाने जुलै 2025 मध्ये वीर पहाडियासोबतचे नाते सार्वजनिक केले होते. तेव्हापासून हे कपल नेहमीच चर्चेत राहिले. आता त्यांच्या ब्रेकअपच्या बातमीने बॉलिवूड वर्तुळात खळबळ उडाली आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

‘जना नायकन’ हिंदीमध्येही होणार रिलीज? जाणून घ्या थलापती विजयच्या चित्रपटाबाबत मोठा अपडेट

हे देखील वाचा