Tuesday, May 21, 2024

अपारशक्तीने मध्यरात्री केले होते आकृतीला प्रपोज, जाणून घ्या त्यांची प्यार वाली लव्हस्टोरी

आपल्या अभिनय आणि चित्रपटांव्यतिरिक्त बॉलिवूड अभिनेता अपारशक्ती खुराना(Aparshakti Khurana) त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल देखील खूप चर्चेत आहे. अपारशक्ती आणि त्याची पत्नी आकृती आहुजी यांची जोडी चाहत्यांना खूप आवडते. आज त्यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे. दोघांच्या लग्नाला आठ वर्षे पूर्ण झाली आहेत. विशेष म्हणजे अपारशक्ती आणि आकृतीची लव्हस्टोरी खूपच फिल्मी आहे. जाणून घेऊया त्यांची प्रेमकहाणी….

अपारशक्ती खुराना आणि आकृतीची प्रेमकहाणी मैत्रीपासून सुरू झाली. डेटिंगला सुरुवात करण्यापूर्वी दोघे खूप चांगले मित्र होते. दोघांचे अनेक वर्षांचे नाते होते. यानंतर त्यांना एकमेकांशी प्रेम झाले आणि दोघे रिलेशनशिपमध्ये आले.

माध्यमाच्या वृत्तांवर विश्वास ठेवला तर, एके दिवशी अपारशक्ती खुराणा यांनी आकृतीला फिल्मी अंदाजमध्ये प्रपोज केला. शिफ्ट संपवून तो थेट आकृतीच्या घरी गेला. वास्तविक, अपारशक्ती खुराणा जेव्हा रेडिओ जॉकी असायचा तेव्हा त्याने एक दिवस आकृतीला प्रपोज करायचे ठरवले आणि शिफ्ट संपवून थेट आकृतीच्या घरी गेले. आकृती आणि अपारशक्ती खुराना यांच्यातील डेटिंगची प्रक्रिया बराच काळ चालली आणि दोघांनीही आयुष्यात अनेक आठवणी उभ्या केल्या.

प्रदीर्घ नात्यानंतर अपारशक्ती खुराना आणि आकृती खुराना यांनी 7 सप्टेंबर 2014 रोजी लग्नगाठ बांधली. या लग्नात दोघांच्या जवळचे लोक सहभागी झाले होते. अपारशक्ती खुराना आणि आकृती आहुजा यांचे पंजाबी पद्धतीने लग्न झाले. अपारशक्तीच्या लग्नात अपारशक्ती खुराना आणि ताहिर कश्यप यांनी जबरदस्त डान्स परफॉर्मन्स दिला. अपारशक्ती खुरानाने चित्रपटसृष्टीत चांगले नाव कमावले आहे, तर आकृती आहुजा ही एक उद्योजिका आहे. गेल्या वर्षी जूनमध्ये अपारशक्ती खुराना यांनी सोशल मीडिया अकाऊंटवरून माहिती दिली होती की, त्यांची पत्नी आकृती आहुजा प्रेग्नंट आहे आणि तो लवकरच पिता होणार आहे. 27 ऑगस्ट 2011 रोजीला गोड मुलीला जन्म झाला.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-

HBD साऊथची धकधक गर्ल ‘नयनतारा’ : प्रभुदेवासाठी ख्रिश्चन धर्म सोडून हिंदू धर्म स्विकारला मात्र….
विघ्नेश आधी ‘या’ दोन कलाकारांची धडकन होती नयनतारा, जाणून घ्या का तुटले त्यांचे नाते

हे देखील वाचा